आयुषी दुबे शेगाव
शेगाव (प्रतिनिधी) दि १० तिहेरी तलाक देणे हा कायद्याने आता गुन्हा ठरला असला तरी, अशा पद्धतीने तोंडी तलाक देण्याचे प्रकार काही थांबलेले नाहीत. चिखली येथील एका महिलेने शेगाव पोलिस ठाण्यात पती विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनीही त्याची दखल घेतली आहे. पतीने तिला माहेरात येऊन शिवीगाळ करीत तीन वेळा तलाक म्हटल्याचे संबंधित महिलेने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याचबरोबर सासरच्या मंडळींनी त्रास दिल्याचेहि तक्रारीत नमूद केल्याने पोलिसांनी पती सह 3 जणांविरुद्ध विविध गुन्हे दाखल केले आहे.
चिखली येथील शे.मोहसीन अ.कादर या युवकाचे शेगाव येथील एका युवतीसोबत दिड वर्षांपूर्वी मुस्लिम रितीरिवाजाप्रमाणे लग्न पार पडले होते. लग्नानंतर मात्र आपल्यापतीचे एका महिलेशी अनैतिक संबंध असलयाचे समजल्यावरून अनेकवेळा पतीला समजावण्याचा प्रयत्न केले असता पती सह सासरकडील मंडळींनी शारीरिक व मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. दरम्यान पत्नी आपल्या अनॆतिक संबंधाला विरोध करीत आहे म्हणून २२ नोव्हेंबर रोजी या मुलीला बेदम मारहाण करून घरातून हाकलून देण्यात आले. यानंतर ७ डिसेंबर रोजी पती शे. मोहसीन, सासरा अ. कादर, सासू मालन या 3 जण यांनी शेगावात येऊन मुलीकडील मंडळींना अश्लील शिवीगाळ केली. आणि पती शेख मोहसीन याने आपल्या पत्नीला सांगितले कि, मी एक महिला नाही दहा महिला सोबत अनैतिक संबंध ठेवेल तुझ्याने जे होत असेल ते कर असे म्हणून “मै तुझे अभि तलाक देता हु तलाक, तलाक , तलाक म्हणून शिवीगाळ करत निघून गेले. या प्रकरणी ८ डिसेंबर रोजी पीडित विवाहितेने शेगाव शहर पो. स्टे. ला तक्रार दाखल केल्यावरून पती शेख मोहसीन सह सासू, सासरा अशा 3 जणांविरुद्ध मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण कायद्याअंतर्गत कलम 498, 323, 504, 34 भादवी मुस्लीम महिला विवाह संरक्षण अधिनियम 18 कलम 4 नुसार शे. मोहसीन अ. कादर वय 28 वर्ष, अ. कादर अ. रज्जाक वय 50 वर्ष व मालन बी अ. कादर वय 45 वर्ष या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सध्या सर्व आरोपी फरार आहेत.