शेगाव तालुक्यातील.वरखेड बु. सरपंच निवडणुकीत सौ.शीतल भांगे विजयी टाकळी

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव : तालुक्यातील वरखेड.गट ग्रामपंचायतचे सरपंच पद रिक्त असल्याने सरपंचपदासाठी निवड प्रक्रिया १८ ऑक्टोबर रोजी निवडणूक पद्धतीने ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली. या निवडणुकीत सौ. शीतल अमोल भांगे यांना पाच तर त्यांच्या विरुद्ध असलेल्या सौ. रुपाली गोपाल कराळे यांना दोन मते मिळाल्याने सौ. शीतल भांगे सरपंच पदी विजयी झाल्या. गेल्या काही दिवसांपूर्वी वरखेड बु. ग्राम पंचायतच्या विजया गणेश कराळे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सदर पद रिक्त झाले होते.

यामुळे निवडणुक विभागाने सरपंच पदासाठी निवड कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार १८ ऑक्टोबर रोजी निवडणूक अधिकारी आर. आर. मुंढे यांचे अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतमध्ये निवडणूक पार पडली. यावेळी ९ पैकी ८ सदस्य हजर होते.

यातील एक मत अवैध ठरले. निवडणूक साठी सहाय्यक म्हणून तलाठी हाके, ग्रामसेवक अनिल बिचकुले यांनी काम पाहिले.

Leave a Comment