शेगाव नगर पालिकेला ६ कोटीचा निधी प्राप्त
विठ्ठल अवताडे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधि
शेगाव : येथील नगरपालिकेच्या हद्दीतील चौकांचे सौंदर्यीकरण व रस्ते डेव्हलपमेंटसह विविध प्रकारच्या विकास कामांसाठी आ.डॉ. संजय कुटे यांच्या प्रयत्नाने शेगाव नगर पालिकेला सहा कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.
शासननिर्णय क्रमांक पूरक -२०१९ / ६९ / नवि -१६ दिनांक ३० ऑगस्ट २०२२ नुसार शेगांव नगरपरिषद क्षेत्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे बांधकाम करणे, प्रभाग क्र. १ मध्ये शिवाजी चौकाचे चौक सौंदर्यीकरण करणे, प्रभाग क्र.११ मध्ये गोरोबा चौकाचे चौक सौदर्यीकरण करणे, प्रभाग क्र.४ मध्ये वाल्मिकी चौकाचे चौक सौदर्यीकरण करणे, प्रभाग क्र. १४ मध्ये जिजामाता चौकाचे चौक सौदर्यीकरण करणे, चंद्रलोक सोसायटीमधील ओपन स्पेसमध्ये सौंदर्यीकरण करणे, शेत सर्वे क्र . ३०२ मध्ये ओपन स्पेस / बगीचा विकसीत करणे प्रभाग क्र . १३ भोईपूरा स्मशानभूती विकसीत करणे एकूण रक्कम ४ कोटी रुपये तर एसबीआय कॉलनी परिसर व इंजिनिअरिंग कॉलेज परिसरातील रस्ते विकसीत करण्यासाठी विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून २ कोटी असे एकूण ६ कोटी रुपये जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आ.डॉ.संजय कुटे यांनी खेचून आणले असून बहुचर्चित असलेल्या मटण मार्केटच्या आरक्षित जागेच्या विकासासाठी देखील आ.कुटे यांनी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. आ.कुटे यांच्या विकासकामांचा धुमधडाका नेहमीच सुरू असतो त्यात अधिकची भर टाकत त्यांनी ६ कोटीचा निधी आणल्याने सर्वच स्तरातून आ.संजय कुटे यांचे अभिनंदन व आभार मानले जात आहेत.(श.प्र.)
संतनगरीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून मूलभूत सुविधा नागरिकांना मिळाव्यात, शहराचे सौंदर्यात भर पडावी, स्मार्ट सिटीच्या धर्तीवर शहराचा विकास व्हावा यासाठी शेगाव नगरपालिकेला कधीही निधीची कमतरता भासू देणार नसल्याची प्रतिक्रिया माजीमंत्री तथा विद्यमान आ.डॉ.संजय कुटे यांनी दिली आहे.