इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी
आज दिनांक 17 जून 2023 रोजी सकाळी 08/30 वा. सुमारास शेगाव शहर पोलिसांनी आठवडी बाजारात दारूबंदी कायदा अंतर्गत छापा कार्यवाही करून
आरोपी वासुदेव महादेव तायडे वय 30 वर्षे राहणार चिंचोली यास जागीच पकडून त्याच्याकडून देशी दारू टॅंगो पंच कंपनीच्या 90 एम एल च्या 50 नग शिशा प्रत्येकी किमती 50 रुपये प्रमाणे एकूण 3050/- रू चा मुद्देमाल जप्त केला. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक 1092 सुसर हे करीत आहे.
तसेच सकाळी 9:30 वा सुमारास आरोपी वासुदेव नागोजी फुसे वय 59 वर्षे राहणार शितलनाथ महाराज मंदिराजवळ शेगाव यांच्यावर दारूबंदी कायद्याअंतर्गत छापा कारवाई केली असता
त्यांचे जवळून 80 नग देशी दारू टॅंगो पंच कंपनीच्या सीलबंद बॉटल वायरच्या थैलीसह असा एकूण 4700 रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने सदर मुद्देमाल जप्त करून
दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोहेका 742 गजानन वाघमारे हे करीत आहे.