शेगाव शहर व तालुका काँग्रेस कमिटी व किसान काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांनी काढलेला पिक विमा पूर्णतः मोबदला न मिळाल्यामुळे पिकविमा मिळून देण्यासाठी शेतकऱ्यांकडून मागणी अर्ज घेतले भरून…

शेगाव तालुका प्रतिनिधी अर्जुन कराळे

शेगाव – शेतीचे नुकसान झाल्यानंतरसुध्दा ज्या शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीकडून पूर्णतः मोबदला मिळाला नसेल अशा शेतकरी बांधवांसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने लढा उभारण्यात आला आहे.

अन्याय झालेल्या शेतकरी बांधवांना पिक विम्याचा पूर्ण मोबदला मियाळला पाहिजे यासाठी शर्यतीचे प्रयत्न पक्ष करील त्याकरिता अन्याय झालेल्या शेतकरी बांधवांनी पिक विम्याच्या हप्त्याचा भरणा पावतीची झेरॉक्स या ठिकाणी आपल्या कागदोपत्री सोबत माहिती भरून जमा करावी असे आवाहन.

काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले. सदर नोंदनी ही छत्रपती शिवाजी महाराज चौक शेगाव येथे राबवण्यात आली.

आपल्या शेतीचे नुकसान झालेले आहे त्याची दक्षता घेऊन शेतकऱ्यांची शेतकऱ्यांची मोठी गर्दी या ठिकाणी जमली होती. शेतकरी बांधवांना पूर्ण मोबदला मिळाल्याशिवाय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष स्वस्त बसणार नाही. असा इशारा पक्षाच्यावतीने देण्यात आला. प्रचंड बहुमताने लढा काँग्रेस पक्षाच्या वतीने उभा करण्यात आलेला आहे.

शेतकरी बांधवांनी या ठिकाणी येऊन आपला अर्ज भरवयाचा आहे.असे आवाहन काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले.भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या सूचनेनुसार व जिल्हाध्यक्ष माननीय राहुल भाऊ बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी काढलेल्या पिक विमा पूर्णता मोबदला न मिळाल्याने पिक विमा मिळवून देण्यासाठी शेगाव शहर व तालुका कमिटी व किसान काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या पिक विमा अर्ज भरणा नोंदणी करण्यात आली.

यावेळेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतिने, प्रांताध्यक्ष मा.आ नानाभाउ पटोले यांच्या सुचनेनुसार तसेच बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमीटीचे अध्यक्ष मा.आ राहुलभाउ बोंद्रे यांच्या मार्गदर्शनात, शेगाव शहर व तालुका काँग्रेस तसेच किसान काँग्रेस च्या वतिने आज पीक विमा संदर्भात शेगाव येथे स्टाॅल लावून ज्या शेतक-यांना पीक विम्याचा लाभ मिळाला नाही.

त्यांची माहिती अर्जाच्या माध्यमातून संकलित करताना प्रदेश सचिव रामविजय बुरूंगले, शहराध्यक्ष किरण देशमुख, जिल्हा सरचिटणीस दिपक सलामपुरीया, किसान सेल शहराध्यक्ष प्रकाश शेगोकार, सेवादल तालुकाध्यक्ष अनिल सावळे, बसंत शर्मा, ज्ञानेश्वर शेजोळे, पवन पचेरवाल, दिलीप पटोकार आदी उपस्थित असून सदर स्टाॅल ला शेतकऱ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

Leave a Comment