शेतकरी संघटना ने लावले शेतात दानवे च्या पुतळ्याचे चे बुजगावणे

 

रावसाहेब दानवे हे भाजप चे बुजगावणेच – कैलास फाटे

बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील पहुरजीरा या गावात सत्याग्रह शेतकरी संघटनेने चक्क शेतात बुजगावने लावले आहे तेही केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे त्यामुळे एकच खळबळ माजली आहे दिल्ली येथे गेल्या काही दिवासापासून केंद्राने आणलेल्या काळा कायदा रद्द करावा यासाठी आंदोलने सुरू आहेत. कडक थंडी मध्ये देखील लाखो शेतकरी रस्त्यावर आपल्या मतावर ठाम दिसून आले आहेत. त्यावर दानवे यांनी वादग्रस्त वक्तव्य करत शेतकऱ्यांच्या आंदोलनाची खिल्ली उडवली होती पण दानवे जे काही बोलले ते त्यांचे शब्द नसून त्यांचा बोलता धनी वेगळाच आहे. दानवे हे तर एक भाजप चे बुजगावणे आहे असं परखड मत सत्याग्रह शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय संयोजक कैलास फाटे यांनी मांडले आहे.
केंद्र सरकारचं पितळ उघडे पडतांना दिसत आहे म्हणून केंद्र सरकार शेतकऱ्यांना घातक ठरणारे बिल पटवून देण्यासाठी मोहीम राबवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे व दानवे सारख्या बुजगावण्यांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं लक्ष आंदोलनाकडून वळवून आपल्याकडे वळवण्याची एकप्रकारे सुपारी देण्याचे काम करत आहे. असेही फाटे प्रसिध्दी माध्यमांसोबत बोलतांना म्हणाले.
यावेळी शेतात केंद्रित मंत्री दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे बुजगावणे तैयार करून फक्त पाखरांना हकल्याचे काम करतांना भासविले आहे यावेळी सत्याग्रह शेतकरी संघटनेचे जिल्हा संयोजक राजू भाऊ नाकाडे युवा आघाडी अध्येक्ष आयाज भाऊ शेक युवा आघाडी आकाश देशमुख युवा आघडी गणेश सडत कार अनिल गावंडे शब्बीर शेक निलेश घोपे नंदू सडत कार राजेश ठोके सोपान सोळंके असंख्य कर्यक्रकते उपस्थित होते

Leave a Comment