Home औरंगाबाद शेतकर्या ना सुरळीत वीजपुरवठा करा अन्यथा तीव्र आंदोलन

शेतकर्या ना सुरळीत वीजपुरवठा करा अन्यथा तीव्र आंदोलन

258
0

शेतकर्या च्या सन्मानात जन मंगल संघ मैदानात

सागर जैवाळ सिल्लोड तालुका प्रतिनीधी

सिल्लोड तालुका येथील गेवराई सेमी, बाभूळगाव ,बनकिन्होळा व भायगायब खेडी या गावातील शेतकऱ्यांना आपल्या अनियमित व सुरक्षित वीज पुरवठा वेळापत्रकामुळे पिकांना पाणी देताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
विज ये जा करत असल्यामुळे मोटर जळणे पिके वाळणे तसेच मोटार परत वारंवार चालू करण्यासाठी होणारी दमछाक मानसिक त्रास देणारी आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास महावितरणाच्या अशा अनियमित पुरवठ्यामुळे निघून जाताना दिसतोय.याची दखल जन मंगल संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.राहुल ताठे सर यांनी घेऊन उपकार्यकारी अभियंता सिल्लोड येथे निवेदन देण्यात आले
निवेदनात त्यांनी असेही सांगितले की तात्काळ दखल घेऊन वीज पुरवठा सुरळीत चालू ठेवावा अन्यथा शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन जन मंगल संघाच्या पद्धतीने करण्यात येईल.
निवेदन देतांना जन मंगल संघाचे अध्यक्ष प्रा.राहुलकुमार ताठे,जन मंगल संघाचे तालुकाध्यक्ष जयराम जीवरग,महासचिव कृष्णा जैवाळ,प्रसिद्धी प्रमुख कृष्णा तोतरे ,अविनाश दांडगे,जफर शहा, आकाश शेजवळ,दादाराव गोडसे ,उत्तम ताठे आदींची उपस्थिती होती.

Previous articleबौध्द समाज स्मशानभूमी दुरुस्तीसाठी संग्रामपुर नगर पंचायत विरोधात नागरिकांचे भिक मांगो आंदोलन
Next articleसासऱ्यानेच झाडली सुनेवर गोळी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here