शेतकऱ्यांचे जळालेले ट्रांसफार्म २ दिवसांमध्ये दुरुस्ती करून द्या. अन्यथा आंदोलन :- अक्षय पाटील

 

जळगाव जा. :- यावर्षी शेतकऱ्यांनी रब्बी पिकाच्या पेरणीला सुरुवात केली त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी हरभरा,गहू, कांदा व इतर भाजीपाला पिके पेरलेली आहे.

ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची साधन म्हणून बोर,वीर आहे. ते शेतकरी आपल्या पेरलेल्या पिकाला पाणी द्यायच्या तयारीत आहेत. परंतु महावितरणच्या निष्काळजीपणामुळे तालुक्यातील काही गावातील शेतकरी मात्र हैराण होतांनी दिसतात त्याचे कारण असे की काही ठिकाणी शेतातील ट्रान्सफॉर्म हे बंदअवस्थे मध्ये पडलेले आहे. तर काही ठिकाणी डिपीमध्ये ऑइल कमी व इतर तांत्रिक कारणांमुळे शेतकऱ्यांना वीज पुरवठा होत नाही.

जे ट्रान्सफॉर्म जळालेले आहेत असे ट्रान्सफॉर्म दुरुस्त करा याकरता महावितरण कडे अनेक गावातील शेतकरी मागणी करीत आहेत. यामध्ये पाटण शिवारातील बेद्रे डिपी व तरोडा खु. शिवारामधील गावातील शेतकऱ्यांनी बिलाचा पैसा गोळा करून महावितरण कडे पैसे जमा सुद्धा केले.

परंतु पैसा भरून सुद्धा दाहा-पंधरा दिवस उलटून शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्म भेटत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे.

खरंतर उभ्या जगाचा पोशिंदा म्हणून ज्या शेतकऱ्याकडे पाहील जाते त्या शेतकऱ्याच्या तोंडचा घास जर महावितरण तर काढण्याचा प्रयत्न करत असेल तर हे कदापिही सहन केल्या जाणार नाही ही मागणी घेऊन आज महावितरण कार्यालय गाठत जळगाव जामोद येथे शेतकऱ्यांना सोबत घेऊन युवा आंदोलक अक्षय पाटील यांनी धडक दिली. जर २ दिवसांमध्ये शेतकऱ्यानां ट्रान्सफॉर्म दिले नाही तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा उपकार्यकारी अभियंता यांना दिला.

यावेळी तालुक्यातल व वडशिंगी गावातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

Leave a Comment