शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला मिळणार 12 तास विद्युत पुरवठा

 

हिंगणघाट,समुद्रपूर, सिंदी रेल्वे विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी मानले शेतकरी पुत्र अतुल वांदिले यांचे आभार

हिंगणघाट :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या परिवर्तन यात्रेने जिल्ह्यात परिवर्तनाची सुरुवात झाली आहे… कृषी पंपाला दिवसा विद्युत वाहिनी देण्याची मागणी करत अतुल बांधले यांनी विद्युत विभागाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता…

या इशाऱ्याची दखल घेत विद्युत वितरण कार्यालयाचे कार्यकारी अभियंता यांनी अतुल वांदिले यांना विद्युत वितरण विभागाद्वारे पत्र दिले आहे.. या पत्रात सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत हिंगणघाट विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व कृषी वाहिनीवर आठवड्यातील सातही दिवस सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत थ्री फेज विद्युत पुरवठा देण्यात येईल अशी माहिती दिली आहे..

परिवर्तन यात्रेदरम्यान अनेक शेतकऱ्यांची मूळ समस्या म्हणून पुढे आलेली दिवसा कृषी पंपाला थ्री फेज विद्युत पुरवठा सुरू करण्याची मागणी आता पूर्ण झाली आहे… अतुल वांदिले यांनी परिवर्तन यात्रेदरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांची समस्या समजून घेतली होती.. शेतकऱ्यांना दिवसा थ्री फेज विद्युत पुरवठा कृषीपंपास द्यावा अन्यथा विद्युत वितरण कार्यालयाला टाळे लावण्याची चेतावणी देण्यात आली होती…..

विद्युत विभागाकडून अतुल वांदिले यांच्या चेतावणीची दखल घेत मौखिक आदेश काढन्यात आला आहे.या आदेशाप्रमाणे जिल्ह्यात सर्वत्र सकाळी सहा वाजल्यापासून तर सायंकाळी सहा वाजल्यापर्यंत कृषी पंपाची विद्युत पुरवठा थ्री फेज सुरू ठेवला जाणार आहे.
हिंगणघाट,समुद्रपूर, सिंदी रेल्वे विधानसभा क्षेत्रात परिवर्तन जनसवांद यात्रा पोहना येथील रुद्रेश्वराच्या मंदिरातून माजी गृहमंत्री अनिलजी देशमुख ,जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत तर अतुल वांदीले या नेतृत्वामध्ये सुरु झाली आहे..

हि यात्रा २० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर पर्यंत अविरत सुरू राहणार असून, अतुल वांदिले व त्यांचे सहकारी वेगवेगळ्या गावात कुठे मंदिरात तर कुठे शाळेत मुक्कामी आहेत… अतुल वांदिले यांच्या या जनसंवाद यात्रेदरम्यान विवीध गावात त्यांना मोठा प्रतिसाद दिला जात आहे. आपला शेतकऱ्यांचा मुलगा शेतकऱ्यांच्या समस्येसाठी म्हणून आपापल्या गावात मुक्कामी आला.

असल्याने विविध गावातील नागरिकांकडून त्यांची व त्यांच्या सहकाऱ्यांची जेवणाची व्यवस्था आपल्या घरी आलेल्या पाहुण्या प्रमाणे केली जात आहे… मागील दहा दिवसांपासून अनेक खेड्यापाड्यात मुक्कामी असलेले अतुल वांदिले देखील गावा गावात रमले असल्याचे चित्र सर्वत्र आहे..

गावातल्या नागरिकांची समस्या गावातील शेतकऱ्यांची समस्या ही आपली प्रमुख समस्या समजत मोठ्या पद्धतीने अतुल वांदिले आक्रमक झाल्याचे देखील पहावयास मिळत आहे… अशातच प्रत्येक गावातून उद्भवणारी शेतकऱ्यांची एक प्रमुख समस्या म्हणून कृषी पंपाचा थ्री फेज विद्युत पुरवठा दिवसा सुरू असावा अशा पद्धतीने समोर आली होती…

अतुल वांदिले यांनी विद्युत वितरण कार्यालयाला टाळे लावण्याचा इशारा दिला होता.. अतुल वांदिले यांच्या इशाऱ्याची दखल घेत आता विद्युत वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजत पर्यंत कृषी पंपांना थ्री फेज विद्युत पुरवठा दिला जात आहे… यामुळे आता अतुल वांदीले यांच्या परिवर्तन जनसंवाद यात्रेला यश येताना दिसून येत आहे….

हिंगणघाट समुद्रपूर, सिंदी रेल्वे विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी अतुल वांदिले यांचे आभार मानले आहे..

Leave a Comment