शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी विधानभवनावर निघालेल्या वणी ते नागपुर पदयात्राला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जाहीर समर्थन.

 

प्रतिनिधि सचिन वाघे

हिंगणघाट:- शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र राज्य किसान सभा द्वारा यवतमाळ (वणी) ते नागपूर पदयात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हा तर्फे जाहीर समर्थन देत पदयात्रेत जाम येथे सहभाग नोंदविला.

शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन निघालेल्या या पदयात्रेत विदर्भातील शेतकऱ्याच्या आत्महत्या व अतिवृष्टीने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी अडचणी सांगितल्या. वणी येथून निघालेल्या पदयात्रा जाम येथे पोहचली. जाम येथे शेकडो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.

यावेळी पदयात्रेचे नेतृत्व करणारे श्री तुकाराम भस्मे, महाराष्ट्र राज्य किसान सभेचे अध्यक्ष हिरालालजी परदेशी, उपाध्यक्ष महेश कोपुलवार, सहसचिव अरुन वनकर, राज्य सचिव राजन क्षिरसागर, सहसचिव अशोक सोनारकर, जिल्हा सचिव अनिल घाटे, अनिल हेपट, श्रीमती द्वारकाताई एडमवार, काँग्रेस किसान सेलचे प्रशांत गहुकर इत्यादी चे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी पुष्पगुच्छ देऊन जाम चौरस्ता इथे स्वागत केले.

याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, अमोल बोरकर, प्रवीण श्रीवास्तव, सुनील भूते, सुभाष चौधरी, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष जावेद मिर्झा, किशोर चांभारे, नदीम भाई, अजय पर्बत, जगदीश वांदिले, प्रशांत लोणकर, उमेश नेवारे,अमोल मुडे, बच्चू कलोडे, परम बावने, प्रवीण भुते,अनिल भुते, अरविंद ठाकरे, राजू मुडे, सुशील घोडे, गोलू भुते, पंकज भट्ट, नितेश नवरखेडे, राहुल जाधव, निखिल ठाकरे, रवीकिरण कुटे, मनीष मुडे, वैभव भुते यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यात्रेत सहभागी झाले होते.

Leave a Comment