प्रतिनिधी:(जालना)तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची तात्काळ पाहणी करून मदत द्या व पिक विमा कंपनीने विमा तात्काळ मंजूर करा व ओला दुष्काळ जाहीर करावा.यासाठी दिनांक १३/०९/२०२२ रोजी निवेदन देऊन ही शासन-प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली नाही.या अनुषंगाने आज रामनगर येथे रस्ता रोको करण्यात आला.
जालना तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे.आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या सोयबीन,कापुस,तुर,मुग,उडिद,भुईमूग,ऊस व फळबाग तसेच द्राक्ष या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.तरी आता पिक विमा कंपनीने नुकसान भरपाई शंभर टक्के सरसकट शेतकऱ्यांना देण्यात यावी.राज्य सरकारने महाराष्ट्रतील शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करावा. तसेच पंचनामे न करता शेतकऱ्यांना हेक्टरी सरसकट १,०००००रु.(एक लक्ष रुपये) नुकसान भरपाई म्हणून मदत जाहीर करा.असा तीव्र इशारा शासनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिला.
तसेच मनसे पदाधिकारी व शेतकरी बांधवांना पोलिस प्रशासनाने केली अटक व सुटका
यावेळी उपस्थित जालना जिल्हाध्यक्ष गजानन भाऊ गिते व तालुकाध्यक्ष कृष्णा खलसे,हरीदास लांडे जिल्हाध्यक्ष विधीकक्ष,श्रीकांत राठोड तालुका उपाध्यक्ष,राम कातकडे तालुका उपाध्यक्ष,सुनिल चव्हाण उपसरपंच,गजानन मगर,गजानन गायके,मच्छिंद्र चव्हाण,बाळु कावळे,रोहित व्येव्हारे,ऋषिकेश शिवंत,नागेश वाघमारे,कृष्णा गाडेकर,ओमकार गवळी,विलास घाटे,कृष्णा काटकर,वामन चौधरी,हरी लोंढे,मुक्तर सय्यद,अर्जुन नागवे आदी शेतकरी बांधव व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
प्रतिनिधी:तुकाराम राठोड,जालना