Home बुलढाणा शेतकऱ्यांनी शासकीय तुर खरेदी चा लाभ घ्यावा-आमदार राजेश एकडे

शेतकऱ्यांनी शासकीय तुर खरेदी चा लाभ घ्यावा-आमदार राजेश एकडे

674
0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-

मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री राजेश एकडे, यांच्या हस्ते नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विदर्भ कॉ. ऑप.मार्केटिंग फेडरेशन संलग्नित नांदुरा ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी च्या वतीने शासकीय तुर खरेदी चा शुभारंभ झाला.रु.६,०००/- प्रतिक्विंटल या हमीभावाने शेतकऱ्यांनी शासकीय तुर खरेदी चा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी आमदार राजेश एकडे यांनी केले.या तुर खरेदी समारंभात नांदुरा तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री.पदमभाऊ पाटील,शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य श्री.वसंतराव भोजने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.मोहनराव पाटील,नांदुरा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री भगवानभाऊ धांडे,डॉ.प्रदीप हेलगे,जिल्हा पुनर्वसन समितीचे सदस्य श्री.पुरुषोत्तम झाल्टे,नांदुरा ऍग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनी च्या श्री. अमोल पाटील, व्ही.सी.एम.एस. चे संजय नाशिककर,नादुरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव श्री. संजय पाटील,दुय्यम निबंधक कार्यालयाचे श्री.दहिभाते याच्यासह नांदुरा तालुक्यातील तूर उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleयावल चोपडा रोडवर वेगाने जाणाऱ्या अयसर वाहनाने जाणाऱ्या पादचाऱ्यास उडविले पोलीसात गुन्हा दाखल
Next articleजळगाव जामोद तालुक्यातील अर्ध्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर महिला भूषवणार सरपंचपद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here