सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )
गोरेगाव तालुका सिंदखेड राजा येथेदिनांक 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान गावालगतच असलेल्या गोट्याला आग लागून प्रल्हाद बागुलकर राहणार गोरेगाव तालुका सिंदखेड राजा या शेतकऱ्यांची लागलेल्या आगीमध्ये जवळपास एक लाखाहून अधिक रुपयाचे नुसकान झाले आहे. लागलेल्या सात ते आठ सोयाबीन चे पोते अंदाजे किंमत 36 ते 37 हजार रुपये ची सोयाबीन आगीमध्ये जळून खाक झाली तसेच दोन स्पिंकलर सट, शेती उपयोगी अवजारे, इत्यादी साहित्य लागलेल्या आगीमध्ये जळून प्रल्हाद बागुलकर या शेतकऱ्यांची अंदाजे एक लाख रुपयांपेक्षा जास्त नुस्कान झाले आहे. नेमकी आग कशामुळे लागली होती याचे कारण कळू शकले नाही. परंतु ग्रामस्थांनी वेळेवर मदत करू आग लवकरच आटोक्यात आणली त्यामुळे फार मोठा अनर्थ टळला. लागलेल्या या आगीमध्ये शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्याला काहीतरी मदत मिळावी अशी शेतकरी प्रल्हाद बागुलकर यांची मागणी आहे.