उमरा शिवारातील प्रकार; कंपनीने नुकसान भरपाई देण्याची मागणी
सोयाबीनवर केलेला खर्च गेला वाया : शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान
योगेश नागोलकार
प्रतिनिधी/राहेर
पिकांतील तणावर नियंत्रण मिळविण्यासाठी फवारणी केलेल्या तणनाशक औषधांमुळे पिक करपल्याची घटना पातुर तालुक्यातील उमरा येथील शेतकऱ्याला बसली असून या शेतकºयाने तणनाशक फवारल्यामुळे त्यांच्या सहा एकरावरील सोयाबीन व तुरीचे पीक करपले आहे.तालुक्यातील उमरा येथील शेतकरी पंडीत पांडुरंग इंगळे, यांनी गावातीलच कृषी केंद्रातून २७ जून रोजी weedblock व axisuper कंपनीच्या नामक तणनाशक औषध विकत घेतले होते. ही औषधी त्यांनी २७ जून रोजी आपल्या पाच एकरामध्ये योग्य प्रमाण वापरून फवारली. परंतू या औषधीचा विपरीत परीणाम झाल्याने शेतकºयाचे ६ एकरातील सोयाबीन व तूर पीक करपले आहे. या शेतातील पिकाचे पाने व मुळ काळे पडत असून पिकाने माना टाकायला सुरूवात केल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, याबाबत शेतकरी पंडीत इंगळे यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. सततच्या दुष्काळामुळे शेतकरी आधिच त्रस्त आहे. त्यात सदरचे औषध फवारल्यामुळे मोठे नुकसान झाले असल्याने शेताचे स्थळ निरीक्षण व पंचनामा करण्यात यावा व तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.नुकतेच पेरलेले सोयाबीन, तूर पीक जळाल्याने शेतकºयासमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. दरम्यान, कृषी सहाय्यक शरद पवार यांनी २९ जून रोजी या पिकाची पाहणी केली व पंचनामा केला.यावेळी कृषी सहाय्यक यांनी वरिष्ठांना अहवाल सादर केला जाणार असल्याचे शेतकऱ्यांंना सांगीतले लवकरच जिल्हा कृषी अधिकारी,व शास्त्रज्ञ येऊन सविस्तर पंचनामा करून पुढील कारवाई करतील. यावेळी सरपंच केशव इंगळे , रेणुका कृषी केंद्राचे मालक गजानन अल्हाट ,पंकज पवार ,राहुल पवार, शुभम इंगळे , यांच्यासह शेतकरी उपस्थीत होते.