Home Breaking News शेळ्याचोरी होण्याच्या घटनेने गोंदिया जिल्ह्यात खळखळ,

शेळ्याचोरी होण्याच्या घटनेने गोंदिया जिल्ह्यात खळखळ,

671
0

 

प्रतिनिधी :
भागवत चकोले

गोंदिया 0३: सेळ्यापालन व्यवसाय हा अधिक कमी भांडवळमध्ये केला जाणारा व्यवसाय शेळीपालनातून मोठी आर्घिक कमाई होत असते . कमीत कमी माणसात व जागेत शेळीपालन केली जाऊ शकते . शेळ्यांना आहारही कमी लागत असतो , यामुळे त्यांना गरिबांची गाय म्हटल जाते . कडक थंडीचा फायदा घेत चोरटे रात्री पहाटेच्या सुमारास शेळ्यांची चोरी करण्याचे प्रकार जिल्ह्यात घडत आहेत . सलेकसा तालुक्यातील विविध शेतकऱ्याच्या शेळ्या चोरीला गेल्यानंतर देवरी शहरालगत चिचेवाडा रविद्र लांजेवार यांचे ८ तर चुन्निलाल मडावी यांचे ५ शेळ्याची चोरी , पिंडकेपार येथील चौरे यांच्या १५ ते २० त्यानंतर नकटी येथील दखने यांच्या सुमारे १५ शेळ्या व विविध ठिकाणावरून शेळया चोरी झाल्याचे वृत्त आहे .

पोलिसांनी गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे . शेळ्या आणि बकरी चाकोरी होण्याच्या घटनेने शेळीपालकाची झोप उडाली असून पोलीस विभागाने चोरांचे त्वरित बंदोबस्त करावा हि मागणी शेळीपालकांची आहे . एकंदर या घडणांमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे .

Previous articleअल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून अतिप्रसंग करणाऱ्या आरोपीस जळगाव जामोद पोलिसांनी केली अटक…
Next articleग्रामपंचायत कार्यालय पातुर्डा बु.येथे स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here