मागील काही वर्षांपासून खारपान पट्ट्याचा शाप लागलेल्या संग्रामपूर तालुक्यात आतापर्यंत किडनीच्या आजाराने शेकडो बळी गेले असून शेकडो रुग्णांना किडनी आजाराने ग्रासले आहे. व कित्त्येक रुग्णांना मुतखड्याचा सुद्धा त्रास निर्माण झाला आहे.
मतदारसंघातील लोकप्रतिनिधी सह आरोग्य विभाग किडनी रोगासाठी उपाययोजना करण्यात अपयशी ठरत आहेत. शासनाने तालुक्यातील जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे त्यासाठी 140 गाव पाणी पुरवठा योजना सुरू केली मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी या योजनेचा गाजावाजा करत मोठमोठे फ्लेक्स लावून फक्त फोटो शेसन केले. आजही मतदारसंघातील कित्त्येक गावात 140 गाव पाणी पोहचले नाही. आणि ज्या गावात पाणी पोहचले त्या गावात 10-10 दिवस पाणी सोडल्या जात नसल्याची ओरड गावातील नागरिक करत आहेत. संग्रामपूर तालुक्यात सर्वात जास्त किडनी आजाराने बळी गेले असून आजसुद्धा शेकडो रुग्णांना किडनी रोगाची लागण आहे. आरोग्य विभाग व मतदारसंघातील लिकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे ही गत झाली असल्याची चर्चा परिसरात आहे.
25 नोव्हेंबर रोजी तालुक्यातील वरवट बकाल येथील शे. महेबूब शे. बशीर यांचे किडनी आजाराने मृत्यू झाला असून शेगाव, अकोला येथील खाजगी रुग्णालयात त्यांचा उपचार सुरू होता. त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुले, 3 मुली, नातवंड असा आप्त परिवार आहे.
संग्रामपूरात मृत्यूचे तांडव सुरूच
(22 दिवसात 4 मृत्यू )
3 नोव्हेंबर रोजी संग्रामपूर येथील सचिन सोनोने, 4 नोव्हेंबर रोजी येथीलच पांडुरंग सटोटे, 5 नोव्हेंबर रोजी वानखेड येथील सुनील येणकर व आज 25 नोव्हेंबर रोजी वरवट बकाल येथील शे. महेबूब शे. बशीर या चारही रुग्णांचा मृत्यू झाला असून संग्रामपुरात मृत्यूचे तांडव सुरूच आहेत.