इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
शेगाव येथे खामगाव रोडवर असलेल्या श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालया जवळ श्रींच्या पालखीचे दर्शन घेताना महिलेच्या गळ्यातील तीन ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र लंपास प्रकरणी शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
खामगाव येथून शेगाव कडे परत येणाऱ्या श्रींच्या पालखीचे श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय जवळ दर्शन घेताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील तीन ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र केले लंपास शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत शेगाव शहर पोलीस मित्र कडून मिळालेल्या माहितीनुसार खामगाव तालुक्यातील हिवरखेड येथील सौ आरती रामा कोळपे या 19 वर्षीय महिलेने आज 26 जुलै रोजी शेगाव शहर पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली की 24 जुलै रोजी ती तिच्या भावासोबत खामगाव येथून पालखीसोबत शेगाव येथे पायदळ वारी मध्ये सहभागी झाली होती
शेगाव येथे श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय समोर श्रींच्या पालखीचे दर्शन घेत असताना गर्दीमध्ये कुणीतरी धक्का मारल्याचे जाणविले दर्शन घेतल्यानंतर माझे गळ्यातील मंगळसूत्र तीन ग्रॅम सोन्याचे लंपास झाल्याचे आढळून आले
याबाबत आज 26 जुलै रोजी शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली या तक्रारीवरून शहर पोलिसांनी अज्ञात विरुद्ध कलम 379 भावी नुसार गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय करूटले बक्कल नंबर 1275 करीत आहेत