Home Breaking News श्री कोटेक्स जिनिंग प्रेसिंग ला दोन दिवस भिषण आग लागून अंदाजे 900...

श्री कोटेक्स जिनिंग प्रेसिंग ला दोन दिवस भिषण आग लागून अंदाजे 900 क्विंटल कापूस जळून खाक…

600
0

 

 

( सूर्या मराठी न्युज )

गजानन सोनटक्के जळगाव जामोद प्रतिनिधी

जळगाव जामोद सूनगाव रोडवरील श्री कोटेक्स जिनिंग ला दिनांक 27 नोव्हेंबर च्या मध्यरात्री 11.30 नंतर यार्ड मधील 1700 क्विंटल कापसाच्या गंजीला भीषण आग लागून 450 ते 500 पेक्षा जास्त क्विंटल कापूस जळून खाक झाला. दिनांक 28 नोव्हेंबर ला खरेदी चा मुहूर्त असल्याने अगोदरच्या दिवशी जिनिंग प्रेसिंग युनिट सुरू करण्यात आले होते त्यावेळी इलेक्ट्रिक युनिट मध्ये स्पार्क होऊन उडालेल्या ठिणगी ने सदर भीषण आग लागली. मध्यरात्री लागलेली आग जळगाव जामोद, शेगाव आणि नांदुरा येथील अग्निशमन वाहनांच्या साहयाने पहाटे 5 च्या दरम्यान विझविण्यात यश आले. आधीच पेटलेल्या कापसाने दुसऱ्या दिवशी दिनांक 28 नोव्हेंबर ला पुन्हा दुपारी 3 च्या दरम्यान पेट घेतला आणि पुन्हा 400 ते 500 क्विंटल कापूस जळून खाक झाला. सदर वार्ता शहरात कळताच या ठिकाणी शेकडो कापूस उत्पादक शेतकरी जमा झाले होते.
यावेळी घटनास्थळी आ डॉ संजय कुटे, पणन महासंघाचे उपाध्यक्ष प्रसेनजीत पाटील, राठी जिंनिंग चे ओंकारदास राठी, सुपो जिंनिंग चे संचालक डॉ किशोर केला, ग्रेडर गावंडे साहेब, नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ आशिष बोबडे, पोलीस अधिकारी, विजवीतरन कंपनी चे श्री होणे साहेब यासह शहरातील अनेक नागरिक व कार्यकर्ते यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले होते.

Previous articleसंग्रामपूर तालुक्यात  किडनीच्या  आजाराने  आणखी एक बळी ….. 1 महिन्याच्या आत सहावे मृत्यु;मृत्यूचे तांडव सुरुच …
Next articleठेकेदार रमेश काटे यांच्याकडून गावातील 50 कुटुंबीयांना मोफत ब्लँकेटचे वाटप !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here