श्री गजानन महाराज इंग्लिश स्कूलद्वारा आयोजित आंतरशालेय किडा स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न

 

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

श्री ग. म. इ. स्कूल शेगांव तर्फे विविध आतंरशालेय किडा स्पर्धांचे आयोजन दि. १३/१२/२०२३ ते १५/१२/२०२३ यादरम्यान श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविदयालयात करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन श्री गजानन शिक्षण संस्थेचे सचिव यांच्या हस्ते झाले व श्री ग.म. अभियांत्रिकी महाविदयालयाचे प्राचार्य, व श्री ग.म. इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या यांच्या सोबतच तालुका किडा अधिकारी श्री. लक्ष्मी शंकर यादव व मा. आदित्य जोशी सर यांची विशेष उपस्थिती लाभली.

शाळेतर्फे प्रथमच विविध आतंरशालेय किडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले व त्यास उत्सफुर्त असा प्रतिसाद मिळाला. शेगांव व परिसरातील विविध १४ शाळांच्या जवळपास ७०० खेळांडूनी सहभाग घेतला. यामध्ये वयोगटानुसार किकेट, कबड्डी, खो-खो, धावणे (१००/२०० मी.), बुध्दीबळ अशा वैयक्तिक व सांघिक किडाप्रकाराचा समावेश होता.

सांघिक किडाप्रकारात विजेता व उपविजेता संघाना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच वैयक्तिक किडाप्रकारात विजेत्यानां सुवर्णपदक, रजतपदक व कांस्यपदक देउन गौरविण्यात आले. हे सर्व श्रींच्या कृपाआर्शिवादातून होत आहे.

Leave a Comment