श्री जलाराम बाप्पा जयंती प्रित्यर्थ १९ नोव्हेंबरला ”स्वर्णीम महोत्सव

 

प्रमोद जुमडे/वर्धा

“हिंगणघाट येथील शीतला माता मंदिराजवळ दानी महाराजाच्या मंदिरातील जलाराम बापाच्या मूर्तीची स्थापनेला 51वर्ष पूर्ण होत आहे. जयंतीनिमित्त प्रसादाचा कार्यक्रम व भजन पूजन कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.या मंदिरात 1973 साली बाप्पाच्या मूर्तीची स्थापना नरली बाई माधव जी चंदाराणा यांच्या हस्ते करण्यात आली होती.

त्या वर्षापासून प्रसादाचा कार्यक्रम हरीभाई, अरुण भाई व डाह्या भाई हे सुरत वरून हिंगणघाट ला येऊन त्यांचे सुपुत्र मनोज, जयेश, राकेश, नितीन व संजय चंदाराणा कार्यक्रमाचे नियोजन करून कार्यक्रम पूर्णपणे यशस्वी करतात.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 19 नोव्हेंबरला दुपारी बारा ते संध्या आठ पर्यंत प्रसादाचा सर्वांनी लाभ घेण्याचा आग्रह चंदाराना परिवाराणी केला आहे.

Leave a Comment