श्री भगवंत शीला प्रतिष्ठान, अकोला. किती प्रिंटर्स अकोला, आणि पाडसूळ ग्रामस्थांच्या वतीने पाडसूळ येथे काल दि. 27 जानेवारी 2023 रोजी,

 

इस्माईल शेख शेगाव

श्रीहनुमान मंदिर सभा गृहात, सुवर्ण महोत्सवी दिंडी सोहळा निमित्ताने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी शेगाव येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त ,संत साहित्य अभ्यासक ह. भ. प.डॉ. ज्ञानेश्वर मिरगे होते.

.ग्रामस्थांच्या वतीने डॉ. ज्ञानेश्वर मिरगे यांचा हार्दिक सत्कार करण्यात आला. डॉ. मिरगे यांनी शब्दांकित केलेले..

जीवन गौरव सन्मानपत्र ह .भ. प . श्री.सहदेव महाराज डोंगरगावकर यांना भगवंत शीला प्रतिष्ठान चे विश्वस्त दैनिक भास्कर अकोला विभागीय व्यवस्थापक पत्रकार श्री. राजीवजी पिसे ,श्री हरिचंद्र पाटील, कीर्ती प्रिंटर्स संचालक बंधू श्री संजय पिसे ,श्री संतोष राव पिसे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर मिरगे यांचे हस्ते प्रदान करण्यात आले.

प्रज्ञावंत इंजिनियर श्री. कैलास पिसे लंडन यांचाही अध्यक्षांच्या हस्ते गौरव करण्यात आला . डॉ. मिरगे यांनी कार्यक्रमात सुंदर मार्गदर्शन केले. श्री सहदेवरराव पाटील यांनीही विचार व्यक्त केले.

व्यासपीठावर श्री पुरुषोत्तम जी पाटील, श्री विष्णू अण्णा पाटील, सौ गंगाबाई पाटील , श्री प्रकाश नेमाडे उपस्थित होते .या प्रसंगी बँक अधिकारी श्री विजयराव चिकटे ,सौ सुषमाताई चिकटे पर्यवेक्षिका सौ शुभांगी मिरगे, असंख्य वारकरी ,टाळकरी, ग्रामस्थ, अकोला येथील पिसे पाटील परिवारातील मंडळी उपस्थित होती .श्री संजय पिसे यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचलन पत्रकार श्री राजीव पिसे यांनी केले.

Leave a Comment