सोनाळा , संग्रामपूर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या सोनाळा येथे कार्तिक पोर्णिमेला श्री संत सोनाजी महाराजांची यात्रा महोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात येतो. पण यंदा कोरोणा महामारी च्या प्रभावामुळे यात्रा, रथउत्सव, काला व महाप्रसादाचे कार्यक्रम स्वयंस्फूर्तीने गावकऱ्यांनी व संस्थांनी बंद करण्याचे लेखी पत्र पोलीस स्टेशन यांना दिल्यावर एकदम साध्या पद्धतीने दिनांक एक डिसेंबरच्या रात्री बारा वाजता पोलिसांच्या परवानगी व उपस्थित गावातील मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत परंपरेनुसार रथाची पूजाअर्चा केली तर पोलिसांच्या समोर रथाची प्रतिकृती म्हणजे लहान पितळी रथ डोक्यावर ठेवून गाव प्रदक्षिणेला नेण्यात आले त्यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक तसेच दंगा काबू पथक ५ ते ७ पोलिस उपनिरीक्षक 140 ते पोलिसांचा तगडा बंदोबस्त असताना मिरवणूक निघाली तर कशी .. पोलिसांच्या कार्यकुशल तेवर समस्त गावकरी व व भक्त प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे….
गावातील मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत परंपरेनुसार रथाची पूजाअर्चा केली तर पोलिसांच्या समोर रथाची प्रतिकृती म्हणजे लहान पितळी डोक्यावर घेऊन गाव परदेशी नेला नेण्यात आले यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही रस व्यवस्थित मंदिर स्थळी पोचवण्यात आला या मिरवणुकीदरम्यान कोणीही पोलीस अधिकारी हजर नव्हते पोलिसांनी नियुक्त केलेले व्हिडिओ शूटिंग चालू होते या प्रकारामुळे कोणतेही कायदा-सुव्यवस्था बिघडला नाही उलट प्रशासनाला सहकार्य केले असल्याचे भाविकांनी एका निवेदनाद्वारे स्पष्ट स्वरूपात सांगितले .
शासनाने स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी गेल्या तीन वर्षापासून जिल्हा प्रशासनाला चुकीचे अहवाल पाठवून यात्रा बंद करण्याचे घाट घातला आहे पोलिसांनी दिलेल्या अहवाल खरा ठरवण्यासाठी गावकऱ्यांवर वचपा काढण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करत असल्याचे व गावामध्ये दरवर्षीच्या यात्रेमध्ये पोलीस प्रशासन विरुद्ध लोकनाट्य मंडळ कधी तर भक्तगण असे असताना पोलिसांनी यात्रे संबंधित चुकीची माहिती वरिष्ठ पातळीवर देण्यात आली या अनुषंगाने याहीवर्षी पोलिसांनी पूर्वीचा डाव मनात घेऊन यात्रेची व गावकर यांची प्रतिमा मलिन करत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी याकरता 5 डिसेंबर 2020 शनिवारला गाव स्वयंस्फूर्तीने बंद करण्यात येत असल्याचे एका निवेदनात गृहमंत्री पालकमंत्री खासदार आमदार महानिरीक्षक अधीक्षक मुख्यमंत्री यांना अधिकार्यावर कारवाई करण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे.