संग्रामपूर वकील संघाची नुतन कार्यकारणी गठीत.

 

[अध्यक्षपदी- अॕड.गोतमारे ,उपाध्यक्ष- अॕड.गायकी, सचिव- अॕड.चिकटे.]

संग्रामपूर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय अंतर्गत असलेल्या संग्रामपूर तालुका वकील संघाची बैठक दि .१६/ ऑक्टोबर रोजी वकील संघाचे चेंबर मध्ये मावळते अध्यक्ष अॕड पि.के. घाटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत विविध विषयावर चर्चा होऊन ठरल्याप्रमाणे कार्यकारिणीचा कालावधी संपल्याने नुतन कार्यकारणी गठीत करण्यात आली यामध्ये अध्यक्षपदी महिला अॕड. एस. एस. गोतमारे(मेतकर) मॅडम यांची तर उपाध्यक्षपदी अॕड. एस.आर. गायकी यांची उपाध्यक्षपदी नव्याने निवड करण्यात येवून अॕड. जी.जी.यांची सचिवपदी फेर निवड करण्यात आली.

असून कोषाध्यक्षपदी महिला अॕड. एस.आर.सातव मॅडम यांना कायम ठेवण्यात आले आहे.

संग्रामपूर न्यायालयाचे नवीन इमारत बांधकाम मंजूर झाले असून इमारत बांधकाम लवकर होण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा. ह्याकरीता सर्वांनी प्रयत्न करावे व विविध उपक्रमात सहभाग घेवून न्यायालयीन कामात एकजुटीने संघटित राहून काम करावं असे आवाहन मावळते अध्यक्ष पि.के. घाटे यांनी अध्यक्षीय भाषणातून केले आहे. याप्रसंगी जेष्ठ विधीतज्ञ अॕड. जी.एस.गावंडे ,अॕड. एस, जी. अजणे,,अॕड. बी. एस. गवई,अॕड. एल.एफ. राठी

अॕड.जी.ए.क्षीरसागर,अॕड.ए.एस.गिरजापूरे, अॕड. के. पी .बावस्कर,तसेच अॕड.बी.पी. खंडेराव,अॕड.व्हि.एम. घोडेस्वार,अॕड. एम. एस. किर्तने,अॕड.पी.पी.अग्रवाल,

अॕड.एन.एस.गव्हांदे,अॕड.व्हि.पी.वानखडे, अॕड.व्हि.एम.बावणे, अॕड.डी.वाय.गव्हांदे, अॕड.ए. एस धामोळे यांच्यासह वकीलांचे कारकून देवानंद इंगळे उपस्थित होते.

Leave a Comment