संग्रामपूर तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्षपदी शिवकुमार चांडक तिसऱ्यांदा अविरोध

 

संग्रामपुर  तालुक्यातील पातुर्डा येथील सरस्वती वाचनालय शनिवारी दुपारी १ वा.तालुक्यातील ग्रंथालय कार्यकर्त्यांची सभा संपन्न झाली यावेळी तालुका ग्रंथालय संघच्या तालुकाध्यक्ष पदी शिवकुमार चांडक यांची सलग तिसऱ्यांदा सर्वानुमते अविरोध निवड करण्यात आली या सभेच्या अध्यक्षस्थानी शिवकुमार चांडक तर प्रमुख पाहुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक हिम्मतराव भाकरे , माजी अध्यक्ष उत्तमराव तायडे , विनायक चोपडे संचालक, व जिल्हा ग्रंथालय कर्मचारी संघ अध्यक्ष अनंता सातव उपस्थित होते.सभेमधे २०२१ ते २०२३ करीता तालुका ग्रंथालय संघाची नुतन कार्यकारिणी निवड करण्यात आली. ग्रंथालय पदाधिकारी च्या सभेत सर्वाच्या समन्वयातु सर्वानुमते अध्यक्षपदी शिवकुमार चांडक यांची निवड करण्यात आली,तर उर्वरित कार्यकारिणी मधे शरद बनकर-उपाध्यक्ष,श्याम इंगळे-सचिव,दिनेश देशमुख-कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर उर्वरित सदस्य म्हणुन विजय गाळकर, महादेव जाधव, विनायक राऊत,भाऊराव वानखडे,उध्दव व्यव्हारे,श्रीकांत चावरे,माधव उन्हाळे,पंकज गोमासे, धर्मेंद्र इंगळे, प्रकाश अरबट व भारत बाजोड यांची निवड करण्यात आली संचालन अनंत सातव तर आभार श्याम इंगळे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी गजानन राजनकर, निखिल देशमुख यांनी परिश्रम घेतले. शिवकुमार चांडक यांची सलग तिसऱ्यांदा संग्रामपुर तालुका ग्रंथालय संघच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल त्यांचे सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे

Leave a Comment