संग्रामपूर तालुक्यातील वडगाव वान येथील शासकीय स्वस्त धान्य दुकानदारावर जो अन्याय झाला आहे त्या विरोधामध्ये शेगाव तालुका व शहर स्वस्त धान्य दुकानदार याच्या संघटनेतर्फे माननीय बुलढाणा जिल्हाधिकारी यांना तहसीलदार तर्फे निवेदन देण्यात आले.

 

शेख इस्माइल शेगांव

या ठिकाणी निवेदनामध्ये संघटनेच्या पदाधिकाऱ्याने असे म्हटले आहे की जो स्थानिक स्वस्त धान्य दुकानदार व त्याचा मुलगा याला गावातील एका इसमाने मारहाण व शिवीगाळ केली व ईपास मशीनचे तोडफोड केले

त्याच अनुषंगाने या स्वस्त धान्य दुकानदारांचा असा रोष आहे की संबंधित व्यक्तीवर शासनाची मालमत्ता व शासकीय कामांमध्ये अडथळा निर्माण केल्यामुळे त्याच्यावर 353 हा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे .
परंतु दुसरा सवाल असा आहे की शासनाने या स्वस्त धान्य दुकानदारांना जी ई पास मशीन दिलेली आहे तिच्यामध्ये असंख्य नेटवर्कचे प्रॉब्लेम येतात त्यामुळे संबंधित ग्राहकाला काही तास थांबावे लागते त्यामुळे असे प्रकार घडतात शासनाने या ठिकाणी योग्य दखल घेऊन या मशीनला चांगल्या दर्जाचे नेटवर्क देऊन ही सगळी समस्या सोडवावी अशी सर्व स्वस्त धान्य दुकानदार यांची मागणी आहे.
यावेळी निवेदन देताना स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विजय भाल तिलक, तालुकाध्यक्ष रमेश धनोकार, शहराध्यक्ष विनोद लांजुळकार, ए व्ही देशमुख, छोटू पाटील गजानन डिगोळे माजी तालुकाध्यक्ष मोहन कराळे तालुका सचिव प्रभाकर पहुरकर आधी तालुक्यातील व शहरातील स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते.

Leave a Comment