संग्रामपूर तालुक्यात अवैध्य. रेती तस्करी जोमात , तर महसुल प्रशासन कोमात,,

 

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील काकणवाडा,,परिसरातील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात खुले आम अवैद्य रेती वाहतूक सुरू असून महसूल.विभागाचे याकडे साफ दुर्लक्ष्य असल्याचे चित्र दिसुन येत आहे. त्यामुळे रेती तस्करी जोमात तर महसुल विभाग कोमात असे म्हणावयास काही हरकत नाही .
काकनवाडा परिसरातील नदीपात्रात दररोज तेल्हारा व संग्रामपूर तालुक्यातील किमान पंधरा ते वीस वाहने
बिनधास्त दिवसा ढवळ्या रेतीचे उत्खनन करून वाहतूक सुरू असून महसूल विभागाचा लाखोंचा महसूल बुडत असून महसुलचे काही संबंधित अधिकारी ,कर्मचारी मुद्दाम डोळेझाक करीत असुन स्वतःचे भलं तर करुन घेत नाही ना?. रेती तस्करांची ही एवढी फिल्डींग लागलेली असते की,एखादे वेळी अधिकारीला कोठून जर निरोप आला की,रेती वाहने नदीपात्रात वाहने आली .तर लगेच धाड टाकनाऱ्याचे अगोदरच सर्व वाहने पसार होतात.त्यामुळे पथक नियुक्त करुनही कुचकामी ठरले आहेत. बरेच वेळा तहसील कार्यालयात वाहन जमा करण्यासाठी आणतांना तेही पसार होते. तरी याकडे वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे,. सूर्या मराठी न्युज साठी अनिलसिंग चव्हाण सह निलेश चिपडे संग्रामपूर, बुलढाणा

Leave a Comment