संग्रामपूर शहराच्या मध्यभागी व भरवस्तीत असलेले देशी दारू दुकान हटवन्यात यावे – सौरभ बावस्कार

 

दारूचे दुकान स्थलांतर करणे बाबत

 

संग्रामपूर शहराच्या व मध्यभागी असलेले शहराच्या रस्त्यावर व जिल्हा परिषद शाळेच्या रस्त्यावर देशी दारूचे दुकान गेल्या कित्येक वर्षापासून सुरू आहे त्यामुळे बऱ्याच वेळा या दारूच्या दुकानामुळे शहरांमध्ये शांतता व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बऱ्याच वेळा निर्माण झाला आहे तसेच याच देशी दारूच्या समोरून जिल्हा परिषद शाळेचा मुख्य रस्ता सुद्धा आहे त्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यावर या देशी दारुच्या दुकानामुळे विद्यार्थ्यावर विपरीत परिणाम होत आहे तसेच या देशी दारू दुकानात समोर दररोज दारू पिणाऱ्या दारुड्यांचे नेहमीच वाद विवाद होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना देखील या गोष्टीमुळे या रस्त्याने जावे की नाही जावे असा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये होत असल्यामुळे विद्यार्थी सुद्धा या मुख्य रस्त्यावरून जाण्यास तयार होत नाहीत त्यामुळे देशी दारुच्या दुकानामुळे बऱ्याच विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

तसेच देशी दारूच्या दुकानामुळे विद्यार्थ्यावर वाईट संस्कार पडत आहेत तसेच हे देशी दारू चे दुकान शहराच्या मधोमध असल्यामुळे नागरिकांना सुद्धा दारुड्याचा त्रासामुळे नागरिकांना खूप मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे त्यामुळे तात्काळ हे भरवस्तीत असलेले देशी दारूचे दुकान संग्रामपूर शहरातून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे जर १२ सप्टेंबर पर्यंत हे दुकान स्थलांतरित नाही झाले तर संग्रामपूर शहरातील एखाद्या ठिकाणी स्थालान्तर करण्यात यावे. अन्यथा संग्रामपुर ठिकाणी एखादे टॉवर किंवा सोले आंदोलन करण्यात येईल,

Leave a Comment