संपूर्ण हिंगोली जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा:-आमदार संतोषराव बांगर

 

 

अंकुश गिरी
ग्रामीण प्रतिनिधी सेनगाव

महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माननीय नामदार दादासाहेब भुसे पाटील यांचा आज हिंगोली जिल्ह्यांमध्ये पाहणी दौरा करून जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीदरम्यान माननीय नामदार कृषिमंत्री दादासाहेब भुसे पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना, पंतप्रधान पिक विमा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, इत्यादी योजनांचा आढावा घेण्यात आला.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार संतोषराव बांगर‌ साहेब यांनी बैठकीमध्ये पिक विमा कंपन्यांच्या गलथान कारभाराबाबत तसेच राष्ट्रीयकृत बँका कडून शेतकरी बांधवांना देण्यात येणारी वागणूक व पिक कर्ज वाटपाबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आले.
यावेळी कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांनी पिक विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला फोन करून सध्या स्थिती चा सविस्तर अहवाल कंपन्यांकडे सादर करून पिक विमा मंजूर करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच राष्ट्रीयकृत बँकेच्या अधिकाऱ्यांना पिक कर्ज वाटपाबद्दल धारेवर धरण्यात आले.सविस्तर परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ‌कृषिमंत्री दादाजी भुसे साहेब यांनी शेतकरी बांधवांनी कुठेही घाबरून जाऊ नये व काळजी करू नये महाराष्ट्रातील शिवशाहीचे ठाकरे सरकार शेतकरी बांधवांच्या सोबत आहे अशा शब्दात शेतकरी बांधवांना धीर दिला. यावेळी हिंगोली जिल्ह्याचे खासदार हेमंत पाटील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोषराव बांगर साहेब जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले आमदार तानाजीराव मुटकुळे आमदार राजू नवघरे जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती फकीरराव मुंडे उद्धवराव गायकवाड उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे संदेश देशमुख जी डी मुळे सुनील काळे नगरसेवक रामभाऊ कदम अनिल देशमुख तालुकाप्रमुख सकाराम उबाळे साहेबराव देशमुख यांच्यासह जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी जिल्हा परिषद मुख्याधिकारी राधाविनोद शर्मा जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर व कृषी विभागाचे सर्व संबंधित अधिकारी शिवसेना उपजिल्हाप्रमुख तालुकाप्रमुख शहर प्रमुख उपस्थित होते.

Leave a Comment