संभाजी ब्रिगेड जिल्हा बैठक संपन्न नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार

 

विठ्ठल अवताडे  शेगाव

३१ डिसेंबर रोजी संभाजी ब्रिगेड बुलढाणा जिल्हा उत्तरची बैठक मलकापूर येथील मराठा सेवा संघाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.या बैठकीला संभाजी ब्रिगेड प्रदेश कार्याध्यक्ष तथा बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख शिवश्री डॉ. गजानन पारधी हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले.

तर प्रमुख उपस्थितीमध्ये संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष योगेश पाटील,जिल्हा कार्याध्यक्ष एस.पी.संबारे, जिजाऊ ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्षा शिवमती कोमलताई तायडे,शुभांगी पाटील होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष योगेश पाटील यांनी केले.

जिजाऊ वंदनेने बैठकीला सुरुवात करून संभाजी ब्रिगेडचे नवनियुक्त सरपंच व सदस्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.तसेच जिल्हा आढावा घेत पुढील दिशा,ध्येय,धोरणे सांगत डॉ.गजानन पारधी साहेबांनी मार्गदर्शन केले.

यावेळी खांद्याला खांदा लावून काम करत संभाजी ब्रिगेडला आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारणात विजय मिळवत यशाच्या उंच शिखरावर नेण्याचे आश्वासन सर्व तालुकाध्यक्षांनी वरिष्ठांना दिले.तसेच आता ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या,

येणाऱ्या निवडणुकांमध्ये पंचायत समित्या व जिल्हा परिषद त्याबत घेऊ अशी ग्वाही नवनिर्वाचित सरपंच व पदाधिकाऱ्यांनी दिली.यामुळे उपस्थित सर्वांमध्ये नवचैतन्य निर्माण होऊन ही बैठक उत्साहात पार पडली.

यावेळी जिल्हाउपाध्यक्ष चेतन धुमाळ,मोताळा तालुकाध्यक्ष गणेश शिंदे,नांदुरा तालुकाध्यक्ष अमर रमेश पाटील,खामगाव तालुकाध्यक्ष कृष्णा वडोदे,जळगाव तालुकाध्यक्ष रामा रोठे,शेगाव तालुकाध्यक्ष विठ्ठल आवताडे,नांदुरा शहर उपाध्यक्ष कुलदीप डंबेलकर,इसापूर शाखाध्यक्ष श्याम काळे,रमेश तांगडे,राम शिंदे,श्रीकृष्ण घोरपडे,गजानन संबारे,एन.जी.सांबारे,सुनील हिवाळे,गजानन बोडखे,प्रदीप गणेश,आकाश निमसे,मंगेश व्यवहारे व इतर उपस्थित होते. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रवक्ते संदीप रायपूरे यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा कार्याध्यक्ष एस. पी.संबारे सर यांनी केले.

Leave a Comment