संविधान दिन लोकोत्सव व्हावा”

 

(तुकाराम राठोड,जालना)

जालना जिल्हातील चक्रवती सम्राट अशोक शिक्षण संस्था नजिक पांगरी संचलित बदनापूर जि.जालना राजर्षी छञपती शाहू महाराज विद्यालय डुकरी पिंपरी,ता.जि.जालना या शाळेत
‘ ‘संविधान दिन’ उत्साहात साजरा कराण्यात आला.यावेळी शाळेतुन गावात प्रभात फेरी काढण्यात आली.त्यावेळी विद्यार्थ्यांनी विविध घोषणा दिल्या-१.जब तक सूरज चाँद तब तक संविधान २. विवेक पसरवू जनाजनात
संविधान जागवू मनामनात ३. समता,बंधुता,लोकशाही संविधाना शिवाय पर्याय नाही ४. कर्तव्य,हक्कांचे भान मिळवून देते संविधान ५. संविधान एक परिभाषा है मानवता की आशा है ६.संविधानावर निष्ठा हीच व्यक्तीची प्रतिष्ठा
७. संविधानाची मोठी शक्ती देई आम्हा अभिव्यक्ती ८.मिळून सारे देऊ ग्वाही सक्षम बनवू लोकशाही ९.संविधानाची कास धरू विषमता नष्ट करू १०. सर्वांचा निर्धार संविधानाचा स्वीकार.असे विविध घोषणाने गाव दणाणून टाकले तसेच शाळेत विद्यार्थांनी गाणे म्हणाले इयत्ता नववी च्या विद्यार्थ्यानी कु.प्रिया जाधव,कु.आरती जाधव,आठवी इयत्ता मधुन कु.दिपाली जाधव,कु.नेहा जाधव ह्या विद्यार्थ्यींनी छान प्रकारे भाषणे दिली.भारताच्या घटना परिषदेने अथक परिश्रम घेऊन देशाची राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला अर्पण केली.त्या घटनेला ७३ वर्षे होत असून,२६नोव्हेंबर हा संविधान दिन उत्साहात साजरा करून लोकशाही संपन्न करू या,असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक मा.वाघमारे सी.जी.केले आहे.यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की घटना परिषदने २६नोव्हेंबर१९४९रोजी राज्यघटना देशाला अपर्ण केली.त्यानंतर दोन महिन्यांनी २६ जानेवारी १९५० पासून या घटनेची अंमलबजावणी सूरू झाली.आणि देशामध्ये लोकशाही राज्यव्यवस्था उभी केली.त्यांचे उत्तरदायित्व म्हणून २६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा करण्यास सुरूवात झाली.तसेच ते पुढे म्हणाले की,देश पातळीवर हा दिवस साजरा केला जात असुन,संविधान दिन हा लोकोत्सव व्हावा.
मोठ्या प्रमाणावर संविधान दिन साजरा करून लोकशाही,समता,स्वातंञ्य,बंधुभाव ही मूल्ये आणि एकात्मता बळकट करावी,असे आवाहान शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री.वाघमारे.सी.जी.यांनी केले आहे.तसेच २६/११/२००८ च्या दहशतवादी हल्यात शहिद झालेल्या भारतीय जवानांना व नागरिकांना भावपूर्ण श्रध्दांजली देण्यात आली.तसेच यावेळी उपस्थित शाळेचे शिक्षक शिक्षकेत्तर वृंद उपस्थित होते.

Leave a Comment