प्रतिनिधी सचिन वाघे
हिंगणघाट:-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले व अनिकेत कांबळे यांनी संविधान दिना निमित्ताने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती हार घालून अभिवादन केले.
भारतीय सविधानाने स्वातंत्र्य ,समता, सामाजिक न्याय ही सर्वोच्च मूल्य प्रदान केली.या मूल्याची जपवणूक करत समाजातील उत्कर्षासाठी कटीबद्ध राहण्याचा निश्चय करू असे मनोगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी व्यक्त केले.तसेच कार्यक्रमाठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनावर आधारित फोटो प्रदर्शनीला भेट दिली.
या कार्यक्रमाला जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, अमोल बोरकर, जिल्हा उपाध्यक्ष अनिकेत कांबळे, नितीन भुते, किशोर चांभारे, गजू महाकाळकर,अजय परबत,राहुल जाधव, सुशील घोडे, प्रशांत मेश्राम,पंकज भट्ट, आकाश बोरीकर, दिनेश नगराळे, शाहरुख बक्ष आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.