समाजवादी पार्टी बुलढाणाच्या वतीने जळगांव जामोद तहसिलवर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दिले निवेदन…

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-

दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात सरकारच्या दडपशाहीला न जुमानता लाखो शेतकरी दिल्लीला घेऊन दहा दिवस झाले आहेत शेतकर्‍यांचे आंदोलन सर्व राज्यांमध्ये आणखी तीव्र होत आहे त्याचे कारण की केंद्र सरकारने केलेले शेतकरी विरोधी कायदे त्याच्यामुळे संपूर्ण देशामध्ये आज शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर असून शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला सर्व स्तरांमधून पाठिंबा मिळत असून समाजवादी पार्टी बुलढाणा जिल्हा सुद्धा शेतकऱ्यांच्या साठी मैदानात उतरली आहे समाजवादी पार्टी बुलढाणा जिल्ह्याचे हाकेला प्रतिसाद देत जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा येथे समाजवादी पार्टी अजहर उल्लाखान अमानउल्ला खान समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव जामोद तहसील कार्यालय येथे आज दिनांक सात डिसेंबर रोजी शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांसाठी भव्य निषेध तसेच शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी जळगाव जामोद येथे 1.किसान विरोधी कायदे मागे घ्या 2. कामगार विरोधी कायद्यातील दुरुस्त्या रद्द करा.3. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट भाव व आधार भावाचे रास्त संरक्षण द्या.4. पिक विमा कंपन्यांवर दबाव आणून शासनाने त्वरित यावर्षीचा पिक विमा शेतकऱ्यांना मिळवून द्यावा यासारख्या अनेक मागण्यांसाठी समाजवादी पार्टी ने दिले तहसीलदारांना निवेदन. निवेदनावर डॉ. मो.जावेद सिद्दिक, जिल्हा उपाध्यक्ष समाजवादी पार्टी लियाकत खान जिल्हा सचिव शेख नफिस,शेख रफिक, मनोज ठाकुर, संजय राजपुत,शकुर खान,सचिन राजपुत,अक्षय राजपुत, दरिया सिंग राजपूत यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्त्यांच्या सह्या होत्या.

Leave a Comment