समाजसेवक श्रीधर रमेश गोपणारायन हे खेकडी, नवथळ आणि परीतवाडा (जिल्हा-अकोला) गावात सरपंच पदाचे उमेदवार

 

शेगाव  प्रतिनिधी इस्माईल

सामाजिक कार्यात घेतात सक्रीय सहभाग

अकोला दि.०१ रोजी खेकडी गावचे सुजाण नागरिक म्ह्णून नावलौकिक असलेले श्रीधर रमेश गोपणारायन यांनी थेट जनतेतून सरपंच पदाचे उमेदवार म्हणून नामनिर्देशन अर्ज भरून उभे आहेत, त्यांनी गेली १० वर्षे स्वतः आणि त्या अगोदर २५ वर्षे त्यांचे वडील बोधाचार्य रमेश पायरुजी गोपणारायन यांनी ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच आणि सोबत आई सौ.साधना रमेश गोपणारायन ह्यांनी उपसरपंच पद यशस्वीपणे सांभाळले आहे असा तीनही गावातील लोकांचा विश्वास आहे, आणि यावेळेस जनतेतून सरपंच निवडून द्यायचा असल्याने खेकडी, नवथळ आणि परीतवाडा या गावातील सर्व तरुण, वृद्ध, जाणकार मंडळी तसेच संपूर्ण महिलांना असे प्रामाणिक पाने वाटते आहे की श्रीधर गोपणारायन हेच सरपंच पदासाठी योग्य माणूस आहे.

श्रीधर गोपणारायन हे गावातच नव्हे तर तालुका व अकोला शहरात सामजिक कार्यात सक्रिय असतात, पंचायत समितीच्या माध्यमातून गावातील महिलांना शिलाई मशीन मिळवून देने, शेतकऱ्यांना फवारणी पंप, ताडपत्री मिळवून देणे, शेतकऱ्यांना पीक विमा, बियाणे वाटप या संदर्भात मदत करणे, लहान मुलामुलींच्या आरोग्यासाठी काम करणे, आबालवृद्ध लोकांना योग्य ती मदत मिळवून सेने त्यामध्ये श्रावण बाळ योजना मिळवून देणे, विधवा महिलांना शासनाच्या माध्यमातून मदत मिळवून देणे अशी कार्य श्रीधर गोपणारायन सातत्याने करीत असतात.

नालंदा बुद्ध विहार समितीला मार्गदर्शन करणे, सर्वधर्म समभाव राखणे, सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालणे, तंटामुक्ती समितीला सल्ला देणे, गावातला वाद- विवाद गावातच मिटवणे, शेतीचे, जागेचे, रस्त्याचे, पाण्याचे भांडण-तंटा मिटवणे अशी कामे तसेच शासकीय योजना गावात कश्या राबता येतील याकडे श्रीधर गोपणारायन यांकगे संपूर्ण लक्ष केंद्रित असते.

निवडणूकिती विरोधाला विरोध म्हणून जरी उमेदवार उभे असले तरी सरपंच पदासाठी उमेदवार म्हणून श्रीधर गोपणारायन हेच खरे तीनही गावाचे प्रतिनिधित्व करु शकतात, व गावाचा योग्य तो विकास करू शकतात अशी संपूर्ण गावकरी मंडळींची पक्की धारण आहे.

खेकडी, नवथळ आणि परीतवाडा या तीनही गावाच्या हक्काचा माणूस म्हणून श्रीधर गोपणारायन यांची घ्याती आहे, आगामी काळात पंचायत समिती तथा जिल्हापरिषद निवडणुकांमध्ये श्रीधर गोपणारायन यांनी सक्रीय सहभाग नोंदवावा अशी अपेक्षा लोकांकडून व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment