समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा ‘बर्निंग बस’ चा थरार चालकाच्या प्रसंगावधानामुळे भीषण अनर्थ टळला तिस जण बचावले

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

अमरावती येथून पुणे येथे जात असलेल्या ट्रॅव्हल्स बसला समृद्धी महामार्गावर चॅनल २८० वर ऐसी वायरींगचे शाँक झाल्याने अचानक आग लागली. या घटनेत बसचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने चालकांसह तिस प्रवाश्यांचे प्राण बचावले.

एमएच ३७ टी ५४५४ क्रमांकाची बस अमरावती येथून पुणे कडे जात होती. ३० सप्टेंबर, शनिवारी रात्री निघाली होती. समृद्धी महामार्गावरील चॅनल क्र. २८० जवळ बसने अचानक पेट घेतला. हा प्रकार लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान दाखवत, बस रस्त्याच्या बाजुला थांबवली व ताबडतोब सर्वच प्रवाशांना खाली उतरवले.

ह्या घटनेची माहिती मिळताच QRV टीम च्या मदतीने आग विझवण्यात आली असून सदर ट्रँव्हल्स मध्ये आसलेले एकुन तिस प्रवाशी व दोन ड्रायव्हर यांना कोणताही प्रकारची दुखापत नसुन वाहन रोडच्या बाजुला उभे वाहतुक सुरळीत सुरू केली फर्दापूर चाैकीचे पीएसआय उज्जैनकर, पोहेकाॅ काेळी, पाेकाॅ नाझीर यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.

क्यूआरव्ही पथकाला पाचारण करीत, वेळीच आग विझवण्यात आली. ह्या घटनेतील चालक शेख रज्जाक शेख आयुब, रा. दारव्हा, जि. यवतमाळ आणि प्रविण मुंडे, रा. मंगरुळपीर, जि. वाशीम यांच्यासह ३0 प्रवाशी सुखरुप आहेत. अचानक घडलेल्या झालेल्या ह्या प्रकाराने भयभीत झालेल्या प्रवाशांना धीर देत, दुसऱ्या बसमधून पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले

Leave a Comment