Home बुलढाणा सरकारने सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा=गणेश सडतकार

सरकारने सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा=गणेश सडतकार

387
0

 

 

 

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे काही ठिकाणी ढगफुटी सारखी अतिवृष्टी झाली तर बहुतांश ठिकाणी रोगराईमुळे मुंग उडीद तीळ कमी दिवसात येणारे पीक त्यांचे अतोनात नुकसान झाले होते आता हातातोंडाशी आलेले सोयाबीन कापूस तुर ज्वारी पिकाचे 80 टक्के नुकसान झाले आहे काही भागात ढग फुटी सारखी अतिवृष्टी झाल्यामुळे जमिनी पाण्या खाली खरडून गेल्या शेतकऱ्यावर पुन्हा फार मोठे संकट आले आहे त्यामुळे शेतकरी आता देशोधडीला लागला आहे अगोदरच कारोना चे संकट हाताला काम नाही शेतीमध्ये पीक पेरणी केली खरी पण ती देखील निसर्गाच्या कोपामुळे निघून गेली आता या अति पावसामुळे शेतकर्‍यांच्या हातात एकही दाणा येणार नाही एवढे नुकसान शेतकऱ्याचे झाले आहे तरी सरकारने सार्वत्रिक नुकसान जाहीर करून हेक्‍टरी 50 हजार रुपये मदत व सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा मदत जर का लवकरात लवकर मिळाली नाही तर मात्र सत्याग्रह शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन सरकारचा हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सत्याग्रह शेतकरी संघटना युवा आघाडी गणेश सडत कार यानी दिला

Previous articleसुशिक्षीत बेरोजगारांना मुकनायक फाउंडेशन चा आधार
Next articleवाडेगांव जिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय शाळेत शालेय पोषण आहाराचे वाटप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here