गोंदिया शैलेश राजनकर
फुलचुर ग्रामपंचायत मधील नवनिर्वाचित सरपंच मिलन भाऊ रामटेक्कर आपल्या कार्यालयात येताच एक्शन मूड मध्ये,त्यांनी फुलचुर ग्रामपंचायत मधील काही लोकांच्या समस्या येकूण त्या वर व आलेले गावकरी बंधूंच्या सोबत होत असलेल्या तीन समाश्यांचा निराकरण करण्यात यशस्वी झाले,पहिली समस्या ग्रामवासीयांना पिण्याच्या पाण्याची कोणत्या कारणा मुळे गैर सोय होत आहे,तर त्यांनी पागोली नदीवर लावलेल्या पम्प हाऊस मध्ये जाऊन पाहणी केली,व समनधीत अधिकाऱ्याला बोलावून या या पम्प हाऊस ची रिपेरिंग करून जनतेला स्वच्छ पाणी मिळेल अशी व्यवस्था लवकरात लवकर करावी,दुसरी समस्या ग्रामपंचायत हद्दीत रस्त्याच्या कडेला राईस मिलचा घाण पाणीचा डपका तयार झाला व तो जमा घाण पाण्याची दुर्गन्ध पसरत असल्या मुळे गाव कऱ्यांना त्रास होतो, व राईस मिलची राखड तेही रस्त्याच्या बाजूलाच टाकण्यात येत असल्यामुळे, त्या रस्त्यावरून बाईक सवार,पायदळ चालणारे याच्या डोळ्यात किंवा वारा आलं कि ती राख लोकांच्या घरात शिरते,म्हणून त्यांनी सरळ त्याच वेळेस राईस मिल मध्ये जाऊन समनधीत मालकाला सूचना दिली कि आपण आपल्या राईस मिल मधील पाणी व राखडी ची स्वतः दोन महिन्याच्या आत व्हिलेवाट लावा, अन्यथा कार्यवाही करण्यात येईल, व त्यांनी सुद्धा आम्ही आपल्या शब्दाचा मान ठेवत लवकरात लवकर राखड व पाण्याची व्यवस्ता करू,त्यानंतर अवेध दुरसंचार टॉवर परवानगी न घेता उभं करण्यात आलं त्याला त्वरित टॉवर काढा व पोलीस ठाण्यात सुद्धा समनधीत टॉवर विरोधात तक्रार करण्यात आली कि आपण सात दिवसाच्या आत जर अवैध टॉवर काढणार नाही तर ग्रामपंचायत तर्फे हा टॉवर काढण्यात येईल, असे ताबळतोब निर्णय घेण्यात आले,व त्यांनी सर्वाना सांगितलं कि आज माझा पहिला दिवस आहे जसजसे मला जनतेच्या हिताचे काही नवीन योजना आल्या असतील त्याला आपण सर्वांनी मिळून कार्यवीनंत करू,कारण मला जनतेनी या फुलचुर गावाच कस नवनिर्माण होईल या करीता माझ्यावर विश्वास ठेऊन मला निवडून आणलं, व मी माझी जवाबदारी खुद लक्ष देऊन इथल्या जनतेला न्याय मिळेल अस काम करणार यात दुमत नाही,व मी सर्व फुलचुर ग्रामवासीयांच मनापासून आभारी आहे कि त्यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला सरपंच पदाचा मान दिल्या बद्दल मनापासून आभारी आहे,