सरपंच पती देवचंद पवार,अमोल बहाळे यांचेवर पत्रकार सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करा; तालुक्यातील पत्रकारांची मागणी

 

जळगाव जा : २९ मार्च रोजी पत्रकार सागर झनके यांना शिविगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सरपंच पती देवचंद पवार आणि अमोल बहाळे यांचेवर पत्रकार सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा या मागणीसाठी जळगाव जामोद तालुक्यातील पत्रकार बांधवांनी 31मार्च रोजी ठाणेदारा मारफत पोलीस अधीक्षक बुलढाणा यांना निवेदन सादर केले आहे.

२९ मार्च रोजी गावातील सरपंच पती देवचंद पवार आणि उपसरपंचाचा मुलगा अमोल बहाळे यांनी दारू पिऊन पत्रकार सागर झनके यांचेघरी येवून हेतूपुरस्पर द्वेशापोटी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती.त्यामुळे सागर झनके यांनी त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशन जळगाव जामोद ला तक्रार दाखल केली

असून त्यांचेवर २९४,३२३,५०६,३४ अशा विविध कलमान्वये गुन्हा सुद्धा दखल करण्यात आला आहे. स्वतः ला सरपंच उपसरपंच म्हणून घेणाऱ्या देवचंद पवार आणि अमोल बहाळे यांचेवर पत्रकार सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा दखल करून कठोर करण्यात यावी यासाठी तालुक्यातील सर्व पत्रकारांनी एकत्र येत सरपंच पती देवचंद पवार व अमोल बहाळे यांचेवर पत्रकार सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करावी यासाठीचे निवेदन ठाणेदार आणि उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांचे मारफत जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा यांना देण्यात आले आहे.

सदर निवेदनावर जेष्ट पत्रकार गुलाबराव इंगळे,सागर झनके,विनोद वानखडे,अश्विन राजपूत,गोपाल अवचार,अनिल भगत,राहूल निर्मळ, दंत्तू दांडगे, गजानन सोनटक्के, मो.फारूख,अनिल भगत,अमर तायडे,योगेश म्हसाळ,अमोल भगत इत्यादी पत्रकारांच्या सह्या आहेत.
पत्रकार सागर झनके आधुनिक केसरी वृत्त पत्राचे बुलढाणा जिल्हा प्रतीनीधी असून संपूर्ण जिल्ह्यात त्यांचा नाव लौकिक आहे.एक अभ्यास व्यक्तीमत्व असलेले पत्रकार सागर झनके चागले कवी,साहित्यीक असून नुकताच त्यांना पत्रमहर्षी स्व.मोहणलालजी बियांनी राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर झाला आहे.आपल्या लिखाणातून ते सातत्याने गोरगरीब जणतेचे प्रश्न मांडत असतात.

सागर झनके हे व्हाईस आँफ मिडियाचे तालुका सहसचिव असून टी.व्ही जर्णीलीस्ट संघटणेचे बुलढाणा जिल्हा प्रसिद्धी प्रमूख आहेत.लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांवर सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने हल्ले होत असून,लोकशाहीसाठी ती घातक आहे. त्यामुळे अशा गावगुडांवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी,तरच लोकशाहीचा चवथा आधारस्थंभ टिकेल अन्यथा, पुन्हा एकदा पत्रकांरांना जीवाने मुकावे लागेल येवढं मात्र खरं…

Leave a Comment