Home Breaking News सराईत गुन्हे असलेला मुख्य आरोपी गजाआड

सराईत गुन्हे असलेला मुख्य आरोपी गजाआड

518
0

 

गजानन सोनटक्के जळगाव जामोद

गेल्या वर्षी जळगाव जामोद तालुक्यात घडलेल्या वाटमारीतील मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळण्यात जळगाव जामोद पोलिसांना यश आले आहे. अजय मन्साराम चव्हाण (26 रा. उमरा, ता. अकोट, जि. अकोला) याला त्याच्या घरातून आज, 4 डिसेंबरला अटक करण्यात आली.
अजय चव्हाणविरुद्ध दर्यापूर, खल्लार, सोयगाव, मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यातही जबरी चोरी, दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. तो अनेक गुन्ह्यांत पोलिसांना हवा होता. बर्‍याच दिवसांपासून पोलीस त्याच्या शोधात होते. मात्र तोव। मिळून येत नव्हता. अखेर त्याला पकडण्यात जळगाव जामोद पोलिसांना यश आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक सुनील जाधव यांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने केली. पथकात सहायक पोलीस निरिक्षक सतीश आडे, पोलीस उपनिरिक्षक भारत बर्डे, पो.काँ.गणेश पाटील, विकास गव्हाण, सुनील वावगे यांनी केली.

अशी केली होती वाटमारी…

बोराळा येथील आदिनाथ पुंडलिक वाघ हे रात्री आठच्या सुमारास मोटसायकलने घरी जात असताना मागून दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांना अडवून खिशातील नगदी 20 हजार 370 रुपये, सॅमसंग कंपनीचा मोबाइल 1500 रुपयांचा चोरून नेला होता. हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलिसांनी बरेच प्रयत्न केले. अखेर संयमाने तपास करत लुटारूंनी हिसकावून नेलेल्या मोबाइलच्या साह्याने पोलीस मुख्य आरोपी चव्हाणपर्यंत पोहोचले

Previous articleश्री संत सोनाजी महाराज यात्रा महोत्सव संबंधी प्रशासनाला चुकीची माहिती देऊन गावाची प्रतिमा मलिन करणा-या अधिकार्‍यावर कारवाई म्हणून स्वयंस्फूर्तीने 5 डिसेंबर रोजी गाव बंद
Next articleमाजी विद्यार्थ्यांनी दिला आठवणीतल्या शाळेला उजाळा…दहा वर्षांनी पुन्हा भरली शाळा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here