सर्व धार्मिक परंपरेला मूठ माती देत केला नवा उपक्रम.

 

शेगाव तालुक्यामध्ये लासुरा गावातील महावितरण चे सहायक अभियंता आदरणीय सुनील जवंजाळ यांच्या आईचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने 16 मे रोजी निधन झाले.

त्यांच्या असती विसर्जनाचा कार्यक्रम हा 18 मे रोजी आयोजित केला होता त्या ठिकाणी त्यांनी त्या असती हे कोणत्याही नदी किंवा नाल्यांमध्ये न टाकता आपल्या शेतामध्ये खड्डा खोदून व त्या खड्ड्यांमध्ये असती विसर्जन करून त्यावर एक आंब्याचे झाड लावले आहे

याच ठिकाणी प्रास्ताविक भाषणामध्ये समाजाला व इतर लोकांना संचालकाने संबोधित करताना सांगले की मनुष्याचा ज्यावेळेस मृत्यू होतो

त्यावेळेस तो पंच तत्वामध्ये विवीध होतो त्यामुळे नदी किंवा नाल्यामुळे त्यांच्या असती टाकण्याच्या आवजी त्या असतीना त्या व्यक्तीच्या आठवण म्हणून त्या असती विसर्जन करून त्या ठिकाणी त्यांची आठवण म्हणून एक झाडाची रोपणी करावी आज संदेश सर्व समाज बांधवांना देत आहोत

Leave a Comment