साकळी मंडळ अधिकाऱ्यांच्या धास्तीने अवैध गौण खनिज वाहतूकदार धास्तावले

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

साकळी ता.यावल येथील मंडळा अंतर्गत काही महिन्यांपूर्वी नव्याने रुजू झालेल्या मंडळ अधिकाऱ्यांच्या धास्तीने व शिस्तीने गाव परिसरातील अवैध रेती व गौण खनिज वाहतूकदार चांगलेच धास्तावलेले दिसून येत आहे.

कारण साकळी मंडळ अधिकारी जगताप साहेब यांनी अवैध गौण खनिज वाहतूकदारांवर कठोर कारवाईची दहशत निर्माण केलेली आहे. तेव्हा महसूल विभागातील आपल्या धडाकेबाज कामांमुळे जगताप साहेब यांची एक

‘ कर्तव्यदक्ष ‘अधिकारी म्हणून ओळख निर्माण झालेली आहे.त्यांनी साकळी येथील सेवेदरम्यान अवैध गौण खनिज वाहतूकदारांवर काही कारवाया केलेल्या आहे.रात्री उशिरापर्यंत आपले कार्यालयीन कामकाज करीत जगताप साहेब यांनी आपल्या कामाची मंडळावर छाप उमटविली आहे.

साकळी महसूल मंडळ अंतर्गत मंडळ अधिकारी पदावरून पी.ए.कढ़नोर हे सेवानिवृत्त झाल्यावर त्यांच्या जागी एस.टी.जगताप यांची मंडळ अधिकारी म्हणून काही महिन्यांपूर्वी नियुक्ती झालेली आहे.सुरुवातीला जगताप साहेब यांनी आपल्या कामाच्या ठिकाणी मंडळ अधिकारी पदाच्या कामकाजाचा व्याप पाहता तलाठी कार्यालयाच्या शेजारी स्वखर्चातून अद्यावत व साजेशे असे स्वतःचे मंडळ अधिकारी कार्यालय नव्याने बांधकाम करून व रंगरंगोटी करून घेतले व त्यानंतर आपले कार्यालय दप्तर अद्यावत केले.कार्यालयाला ‘कॉर्पोरेट लुक ‘ देण्यासाठी कार्यालयाच्या दृष्टीने सजावट केली.त्यानंतर आपल्या कामाला सुरुवात केलेली असल्याचे दिसून आले.

साकळी सह परिसरातील अवैध गौण खनिज वाहतूक लक्षात घेता या वाहतुकीवर कायमचा वचक व पायबंद घालण्यासाठी जगताप साहेब यांनी कडक कारवाई करण्याचा सपाटा लावला व अवैध गौण वाहतूकदारांना दंड ही ठोठावला.यामुळे अवैध गौण वाहतूकदारांमध्ये साहेबांची चांगलीच दहशत निर्माण झालेली असल्याचे दिसून येत आहे.

आपल्या पदाच्या कामामुळे जगताप साहेब यांची धडाकेबाज व कर्तुत्ववान म्हणून ओळख निर्माण झालेली आहे.साहेब रात्री उशिरापर्यंत आपल्या कार्यालयात थांबून कामकाज करीत असतात व जनतेला सेवा देत असतात.त्या दरम्यान अवैध गौण खनिज वाहतूकदार वाहतूक करीत नाही.असे दिसून आलेले आहे.

एकूणच आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर मंडळाधिकारी जगताप यांनी आपल्या कामाची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.त्यांचा कार्यालयीन कामाचा दिवस बुधवार असतो व त्यादिवशी तर अवैध गौण खनिज वाहतूक बंदच राहते.हे विशेष आहे.

Leave a Comment