सिंदखेडराजा ( तालुका प्रतिनिधी ) तालुक्यातील ८० ग्राम पंचायत सरपंच पदाचे आरक्षण आज तहसिलदार सुनिल सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आले असून सर्वसाधारण साठी. , मागास प्रवर्ग. आणि अनुसूचित जाती १८ तर एक अनुसूचित जाती जमाती तर सर्वसाधारण च्या 39 जागा ! राखीव काढण्यात आल्या आहेत .
साखरखेर्डा (प्रतिनिधी )
तालुक्यातील ८० पैकी ४३ ग्राम पंचायतीच्या निवडणूका जानेवारी २१ मध्ये होण्याची शक्यता आहे . त्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने मतदार यादी प्रसिध्द करणे , सदस्यांचे वार्ड निहाय आरक्षण निश्चित करण्यात आले होते . राहीला तो सरपंच आरक्षण निश्चित करण्याचा प्रश्न आज निकाली काढण्यात आला आहे . ८० पैकी ४३ ग्राम पंचायतीचे आरक्षण सोडतीकडे कटाक्षाने लक्ष लागले होते . आज ७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता तहसीलदार सुनील सावंत यांच्या उपस्थितीत आरक्षण काढण्यात आले . अनुसूचित जाती करीता रुम्हणा हे गाव सरपंच पदासाठी राखीव. असून अनुसूचित जाती करीता साठेगाव , धानोरा , सावखेड तेजन , खामगाव , कंडारी , पांग्री उगले , हिवरखेड , पिंपळखुटा , शिवणी टाका , उमरद , वर्दडी बु . , डोरवी , हनवतखेड ( म . पाग्रा ) , आंबेवाडी , पोफळ शिवणी , कुंभेफळ, गारखेडा , पिंपरखेड बु . , तर नागरिकांचा मागास प्रवर्गा साठी कोनाटी , वरुडी , आडगाव राजा , जळगाव , सवडद , पळसखेड चक्का , ताडशिवणी , बाळसमुद्र , सोनोशी , खैरव , महारखेड , मलकापूर पांग्रा , तढेगाव , दरेगाव , सुलजगाव , भोसा , केशवशिवणी , सायाळा , दुसरबीड , वाघाळा , झोटींगा , शेंदुर्जन आणि सर्वसाधारण साठी साखरखेर्डा , उमनगाव , राजेगाव , गोरेगाव , राताळी , सोमदेव , वाघोरा , लिंगा पांग्रीकाटे , धांदरवाडी , तांदुळवाडी , मोहाडी , पिंपळगाव सोनारा , जऊळका , वाघजाई , पिंपळगाव लेंडी , आगेफळ , राहेरी बु . , शिंदी , वडाळी , निमगाववायाळ , चिंचोली जहांगीर , पिंपळगाव कुडा , अंचली , डावरगाव , गुंज , देवखेड , विझोरा , देऊळगाव कोळ , सावरगाव माळा , जांभोरा , नशिराबाद , जागदरी , हनवतखेड ( सि ् राजा ) , हिवरागडलिंग , किनगाव राजा , भंडारी , नाईकनगर , वसंत नगर , दत्तापुर , या गावातील सरपंच पंदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे . यातील महिला राखीव साठी बुलडाणा येथे सोडत निघणार आहे . सरपंच पदाचे आरक्षण निश्चित होताच कही खुशी कही गम असे वातावरण निर्माण झाले असले तरी ४३ ग्राम पंचायत साठी होणारी निवडणूक चुरशीची ठरणार आहे . साखरखेर्डा ही सर्वांत मोठी ग्राम पंचायत असल्याने प्रत्येक निवडणुकीत विकासाला प्राधान्य मतदारांनी दिले आहे . यावेळी तहसीलदार सुनील सावंत , नायब तहसीलदार प्रविण लटके , नायब तहसीलदार पंकज मगर , कर्मचारी शिवाजी पापुलवाड , पुरुषोत्तम हाडे , जे . एच . शिपणे , ताठे यांनी. काम पाहिले . तर ईश्र्वरी निलेश राठोड या चिमुकल्या मुलीने आरक्षण सोडतीच्या चिठ्या काढल्या .