सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )
सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे !
विदर्भातील तसेच सिंदखेडराजा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या साखरखेर्डा येथील ग्रामपंचायत निवडणूकीसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे आणि यासाठीच प्रशासनाने त्याच दिवशी असणारा आठवडी बाजार रद्द करून त्याऐवजी गुरुवार लाच आठवडी बाजार भरणार आहे ।शुक्रवार ला असणारा आठवडी बाजार हा रद्द होणारच अशी शंका भाजीपाला विक्रेते यांनी वर्तवली होती ।त्यामुळे भाजीपाला विक्रेते फळविक्रेते यांना गुरुवारी आपले दुकान मांडावी लागणार आहेत ।साखरखेर्डा हे राजकीयदृष्ट्या संवेदनशील गाव आहे या ठिकाणी होणारी निवडणूक ही अतिशय चुरशीची होणार आहे त्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने पोलीस विभागाने चोख बंदोबस्त ठेवला आहे ।साखरखेर्डा हे गाव सर्वात मोठी असल्यामुळे आसपासची 35 ते 40 खेडे या गावची जोडलेली आहेत त्यामुळे अनेक खेड्यापाड्यातील लोकांचा कामानिमित्त रोज साखरखेर्डा येथे येणे-जाणे असते !