Home बुलढाणा साखरखेर्डा सरपंचपदी दाऊद सेठ कुरेशी तर उपसरपंचपदी सौ. शारदा पाझडे यांची बिनविरोध...

साखरखेर्डा सरपंचपदी दाऊद सेठ कुरेशी तर उपसरपंचपदी सौ. शारदा पाझडे यांची बिनविरोध निवड !

1358
0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सिंदखेडराजा तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच पदाच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकी ह्या पार पडल्या आहेत मिनी म्हणून ग्रामपंचायतची ओळख असते सिदखेडराजा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या व सर्वांची उत्सुकता लागून असलेल्या साखरखेर्डा ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक 11 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता पार पडली ‘यामध्ये सरपंच पदासाठी दाऊत सेठ कुरेशी तर उपसरपंच पदासाठी शारदा प्रवीण पाझडे यांचेच एकमेव अर्ज दाखल झाले होते ।तरीही निवडणूक अधिकारी श्री कुलकर्णी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दहा मिनिटांचा अवधी दिला ‘यानंतर निवडणूक अधिकारी श्री कुलकर्णी यांनी सरपंच पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे दाऊद सेठ कुरेशी यांची सरपंच पदी घोषणा केली तर उपसरपंच पदी सौ शारदा प्रवीण पाझडे यांच्या नावाची घोषणा केली ‘नवनियुक्त सरपंच दाऊत सेठ कुरेशी हे दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते त्यांनी अनेक गोरगरिबांना मदतीचा हात दिला तर लोक डाऊन मध्ये त्यांनी अनेक ठिकाणी अन्नधान्याचे वाटप सुद्धा केलेआहे सरपंच व उपसरपंच पदाच्या नावाची घोषणा होताच सर्व सदस्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले व बाहेर जमलेल्या समर्थकांनी फटाके च्या अतिषबाजी करून आनंद साजरा केला !एकूण 17 सदस्य पैकी 16 सदस्य हे हजर होते तर एकमेव सदस्य हे गैरहजर राहिले यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी श्री कुलकर्णी तलाठी श्री शिंगणे ग्राम विकास अधिकारी श्री आढाव साहेब यांनी काम पाहिले .तर कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून साखरखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री आडोळे यांनी . चोख पोलिस बंदोबस्त लावला होता ‘यावेळी माजी सभापती राजू ठोके माजी उपसभापती सुनील जगताप राष्ट्रवादीचे दिग्गज नेते माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामभाऊ जाधव ।दिलीप इंगळे हे ही यावेळी हजर होते !तालुक्यातील इतर एकूण 23 ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच पुढील प्रमाणे !कोनाटी -सरपंच .श्रीमती सविता परमेश्वर खंदारे .उपसरपंच श्रीमती रंजना अंबादास खंदारे, -पळसखेड चक्का -सरपंच शिवानंद नारायण मुंढे -उपसरपंच उत्तम रामभाऊ खजुरे ‘महारखेड -सरपंच शोभा गजानन जायभाये – उपसरपंच श्री निलेश घुले,खामगाव – सरपंच सौ ज्योती माणिकराव जाधव ‘उपसरपंच श्री अनिल पवार ।पिंपरखेड बुद्रुक – रिक्त -उपसरपंच प्रवीण पवार ।कुंबेफळ – सरपंच श्रीमती सुमन दगडोबा डोंगरे .उपसरपंच सौ शशिकला पवार,धांदरवाडी सरपंच श्रीमती उषा शेळके ‘उपसरपंच श्री सुधाकर हिवाळे ‘पांगरी काटे .सरपंच शिवानंद थिगळे .उपसरपंच श्री नितीन भालेराव .हनवतखेड ( म.पांग्रा )सरपंच श्रीमती संगीता मोरे . -उपसरपंच -योगेश चव्हाण ,पिंपळखुटा सरपंच श्री अनिल काकडे – उपसरपंच श्री गणेश घुगे,पोफळ शिवणी सरपंच – सौ.गीता घाडगे,उपसरपंच -श्रीमती विमल आडे .आंबेवाडी सरपंच सौ सुनिता शिंनगारे ‘उपसरपंच श्री जगदीश राठोड,विझोरा – सरपंच सौ सीमा भानुसे,उपसरपंच सौ शकुंतला झगरे,वडाळी – सरपंच सौ कुशीवर्ता साबळे -उपसरपंच श्री राजू साबळे,जगदरी -सरपंच सौ अश्विनी जायभाये उपसरपंच सौ अनिता सानप, भोसा -सरपंच किंगर मंदा गणेश .उपसरपंच – कुशीवर्ता एखंडे ‘राजेगाव . सरपंच श्री उमेश शेजुळ ‘उपसरपंच .श्री संजय भालेराव,सुलजगाव -सरपंच .गणेश किंगरे – उपसरपंच सौ मंदा किंगरे ‘ हनवतखेड(न.प. सिंदखेडराजा ) सरपंच -सौ आशा जायभाये, उपसरपंच – वर्षा जायभाये, दत्तापूर – सरपंच . संतोष राठोड . उपसरपंच – राजू पवार ‘साखरखेर्डा सरपंच दाऊद सेठ कुरेशी -उपसरपंच सौ शारदा पाझडे ‘देऊळगाव कोळ सौ शालू गायकवाड ‘उपसरपंच – दिलीप मोरे – गारखेड . सरपंच पिराशिला भालमोडे उपसरपंच रिक्त- ‘सर्व नवीन सरपंच उपसरपंच यांना शुभेच्छा देऊन गावच्या विकासासाठी त्यांनी हातभार लावावा हीच अपेक्षा !

 

Previous articleसायळा गावच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रूपालीताई लंबे तर उपसरपंच पदी प्रविण सरकटे यांची निवड !
Next articleनवनियुक्त ग्रामसेवक अर्जुन गवई व सरपंच सौ अर्चना विनोद खरात यांनी शिंदी येथे मार्गी लावले विविध विकास कामे !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here