सारथी फाॕउंडेशन च्या वतिने रुग्णांना अर्थसाहाय्य

 

पिंपळगांव/- दि.२ आॕक्टोंबर

मोतीबिंदु शस्त्रक्रिये साठी आज खामगांव येथे सारथी फाँउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश विठ्ठलराव भिसे यांनी मोतीबिंन्दु शस्त्रक्रिये करिता दोन रुग्णांना अर्थसाहाय्य केले.
सारथी सामाजिक संस्थेच्या वतिने दर रविवारी मोफत नेत्र तपासणी शिबीर नांदुरा व पिंपळगांव काळे येथे आयोजित करण्यात येते असते त्या माध्यमातून रुग्णांना आवश्यक उपचार पद्धती करण्यात येते तसेच गरिब व गरजु रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी अर्थसाहाय्य देखील करण्यात येत असते आज खामगांव येथील श्री नेत्रालय येथे सलीमा बी शे.अन्सार कुरेशी आणी नारायण राघोजी सातव या दोन रुग्णांना मोतीबिंदु शस्त्रक्रिये साठी प्रत्येकी 2-2 हजार रुपयांचे धनादेश वितरित करण्यात आले
यावेळी निलेश पाटिल,डॉ.निलेश जवळकर,अभिषेक हिस्सल,सुयोग मनसुटे आदिंची उपस्थिती होती.

Leave a Comment