साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

 

सिंदी रेल्वे ता.३ : लोकशाहीर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी (ता.१) विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सर्वप्रथम सकाळी १० वाजता वार्ड क्रमांक १७ मध्ये साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन भव्य रॅली काढण्यात आली. रॅली मध्ये राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गंगाधर कलोडे आणि काग्रेसचे अजय कलोडे, गजानन खंडाळे आदीच्या प्रमुख उपस्थीतीसह असंख्य मातंग समाज स्त्री पुरुष सहभागी झाले होते. रॅली मुख्य मार्गने जात विहारात बुध्द आणि आंबेडकर प्रतिमेचे पूजन केले. तसेच संत रवीदास महाराज मंदीरात पुजाअर्चा करुन अण्णाभाऊ साठे उद्यानात समारोप करण्यात आला.

समारोपीय कार्यक्रमात काग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाशचंद्र डफ,शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन लांबट, सामाजिक कार्यकर्ते अनिल साखळे, रवी राणा अशोक कळणे यांनी अण्णाभाऊच्या जीवन कर्यावर प्रकाश टाकुन मातंग समाजाला मार्गदर्शन केले.
सुरेश खंडाळे यांनी संचालन केले. उपस्थितांचे आभार गजानन खंडाळे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नरेश बावणे,आशिष वानखडे,गंगाधर गायकवाड,रोशन बावणे,अजय खंडाळे, आकाश खंडाळे, लक्ष्मी खंडाळे, साहिल खंडाळे आदीनी तसेच शहरातील मातंग समाजातिल बंधु भगिनींनी परिश्रम घेतले.

Leave a Comment