सिंदखेड राजा (सचिन खंडारे )
सिनखेडराजा तालुक्यातील 43 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लवकरच होऊ घातले असून सध्या ग्रामपंचायत वर प्रशासक नियुक्त केली आहे अगोदर असलेले जनतेतून सरपंच पदाची निवडणूक ही यावर्षी होणार नाही नसून ! निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य च आता सरपंचाची निवडणूक होणार आहे : ।त्यामुळे आपल्या वार्डातील ग्रामपंचायत सदस्य निवडून आणण्यासाठी प्रस्थापित पक्षांना व पॅनल धारकांना कस लावावा लागणार आहे !सिनखेडराजा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत साखरखेरडा असून यामध्ये सतरा ग्रामपंचायत सदस्य आहेत पाच वार्डात प्रत्येकी तीन तर एका वॉर्डात दोन सदस्य निवडून येतात !या पाठोपाठ दुसरबीड शेंदुर्जन मलकापूर पांगरा किनगाव राजा ह्या सुद्धा मोठ्या ग्रामपंचायत आहेत !त्यामुळे आतापासूनच आपल्या वार्डामध्ये उत्सुक उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे !साखरखेर्डा येथे काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना हे प्रमुख पक्ष निवडणुकीच्या रिंगणात असतील तर !धनगर समाजाचे प्रल्हाद सोरमारे यांनी तिसरी आघाडी स्थापन केल्यामुळे त्यांचे आव्हान कितपत राहील हेही पाहणे औचित्याचे ठरेल !