सिंदखेड राजा (सचिन खंडारे )
शहरासह ग्रामीण भागामध्ये सुद्धा वीजचोरीचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढले.
असून ही वीज चोरीअकोला येथील विशेष पथकाने महिनाभरात 77 जणांविरुद्ध कारवाई करत जवळपास 12 ते 13 लाखाचा दंड वसूल केला आहे सिंदखेड राजा तालुक्यात सह शहरात वीज चोरी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे कंपनीला मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत असून नेहमी रोहित्रात बिघाड होत आहे ‘परिणामी महावितरण ज्यांच्याकडे मिटर आहे अशांना अंदाजी अव्वाच्यासव्वा बिल आकारते .
एक क्लिक वर पूर्ण बातमी
वीज चोरी करणाऱ्या मुळे मीटर वाल्यांना त्रास सहन करावा लागतो ‘रोहित्र बिघडलं की गावात महिना महिना अंधार असतो
।त्यामुळे अकोला येथील विशेष पथकाने सिंदखेडराजा तालुक्यामध्ये धडक मोहीम हाती घेतली यामध्ये मीटरमध्ये छेडछाड करणे मेन लाइनवर अकोडा टाकणे ‘विविध प्रकारच्या वि चोरीच्या घटना.
अकोला येथील विशेष पथकाने उजेडात आनून ‘तालुक्यातील 77 जणांविरुद्ध कारवाई करून जवळपास 12 ते 13 लाखाचा दंड वसूल केला आहे यामध्ये शहरातील सहा वाइन बार ‘ लॉज या ठिकाणी कारवाई केली आहे विज चोरी करणे हा कायद्याने गुन्हा असून त्यामुळे विजेची चोरी न करता रीतसर मीटर घेऊन महावितरणला सहकार्य करावे असे आव्हान महावितरण तर्फे करण्यात आली आहे !
वीज चोरी करणाऱ्या लोकांची गय केली जाणार नाही ही मोहीम प्रत्येक गावात राबविण्यात येणार असून वीजचोरी करणाऱ्या लोकांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल असे सुद्धा महावितरण’ने सांगितले आहे !