सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीची एक हाती सत्ता, पालकमंत्री डॉ राजेंद्रजी शिंगणे साहेब यांचे वर्चस्व कायम…!मोठ्या गावात डॉक्टर शिंगणे यांची एक हाती सत्ता !

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )-

नुकत्याच जाहीर झालेल्या सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायत निकालाचा कौल ग्रामीण जणांनी राष्ट्रवादीच्या बाजूने दिला असल्याचं चित्र दिसून येत आहे. सिंदखेडराजा
मतदारसंघातील देऊळगावमही, साखरखेडा, शेंदुर्जन, किंनगावराजा, दुसरबिड, खळेगाव, पिंप्री खंदारे, बीबी, सत्ता ह्या शहरीकरणाने व भौगोलिक दुष्ट्या मोठ्या असलेल्या ग्रापंचयातीसह अनेक गावात राष्ट्रवादीची एक हाती सत्ता आल्याने जिल्ह्याचे नेते पालकमंत्री मा ना डॉ राजेंद्रजी शिंगणेसाहेब यांचे सिंदखेडराजा मतदार संघावर निर्विवाद वर्चस्व असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.
तर जिल्ह्यातील सर्व विजयी उमेदवारांचे पालकमंत्री मा ना डॉ राजेंद्रजी शिंगणेसाहेब यांनी अभिनंदन केले असून आता निवडणूक संपली आहे, निवडणुकीच्या कारणावरून कोणीही आपसात वाद करून गावाचं वातावरण खराब करू नये, आता फक्त गावाच्या विकासाचा विचार करावा असे आवाहन केले आहे !

Leave a Comment