Home Breaking News सिंदखेड राजा येथे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या विदर्भ दौऱ्यातील पहिल्या टप्प्याची सांगता...

सिंदखेड राजा येथे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या विदर्भ दौऱ्यातील पहिल्या टप्प्याची सांगता !प्रांत अध्यक्ष ना.जयंत पाटील यांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद !

375
0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

गेल्या 12 दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचे माध्यमातून विदर्भातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचे काम सुरू केली आहे .विदर्भात गेल्या 12 दिवसांपासून आतापर्यंत त्यांनी 66 विधानसभा मतदारसंघात आढावा बैठका घेतल्या आहेत :दिनांक आठ फेब्रुवारी रोजी सिंदखेड राजा येथे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेत तील विदर्भ दौऱ्याची सांगता करण्यात आली !यावेळी राष्ट्रवादी संवाद यात्रा व झालेल्या जाहीर सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मार्गदर्शन करताना सिंदखेडराजा येथील पवार साहेबांच्या जुन्या सहकार्याच्या आठवणीला उजाळा दिला ‘ते पुढे म्हणाले की पवार साहेबांनी अनेक वर्ष खस्ता खाऊन जी माणसं कमवली की कोणत्याही सत्तेपेक्षा मोठी नाहीत पुढे बोलताना ते म्हणाले की आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत बोलताना पवार साहेबांचे नाव घेतले शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी शेतकऱ्यांशी साधण्याचा सल्ला पवार साहेबांनी दिला होता मोदींनी पवार साहेबांचा सल्ला ऐकला तर निश्चितच यातून मध्यम मार्ग निघू शकतो अशीही यावेळी पाटील यांनी सांगितले तसेच ‘सिंदखेड राजा मतदार संघातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी मतदार संघाचे आमदार तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे मनापासून प्रयत्न करत आहेत जिजाऊ स्मारक आला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे ती मागणी आम्ही पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू तसेच राजमाता जिजाऊंच्या नावे सुरू असलेला साखर कारखाना सुरू करण्यासाठी देखील प्रयत्न करू असे आश्वासन यावेळी नामदार जयंत पाटील यांनी दिली ‘यावेळी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले !यावेळी बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अँड नाझेर काझी महिला जिल्हाध्यक्ष अनुजा साळवे युवक जिल्हाध्यक्ष शेखर बोंद्रे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष भूषण दाभाडे जिल्हा अध्यक्ष मीरा बावस्कर बुलढाणा विद्यार्थी अध्यक्ष नरेश शेळके राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख युवक कार्याध्यक्ष रविकांत वरपे युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे संदीप बाजोरिया विदर्भ दौरा समन्वयक प्रवीण कुंटे पाटील विनायक पाटील अँड साहेबराव सरदार आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते ।यावेळी सिंदखेड राजा मेहकर देऊळगाव राजा मतदारसंघातील अनेक पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते !

Previous articleनिर्माणाधीन सिंचन प्रकल्प गतीने पुर्ण कराव जलसंपदा मंत्री जयंत पाटील सिंचन प्रकल्प आढावा बैठक जिगांवसाठी मंत्रालयात स्वतंत्र बैठक घेणार
Next articleखाजगी वाहनाने प्रवास करीत असताना मोबाईल खिशातून लंपास !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here