सिंदी रेल्वेतील रखडलेल्या पुलाचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी….

 

पाच वर्षांपासून पुलनिर्माणाचे काम अपूर्णच… पुला शेजारी पडलेल्या खड्ड्याने होत आहे नीत्याचे अपघात..

नगर परिषद सिंदी रेल्वे येथे कायमस्वरूपी मुख्याधिकारी द्या…

राकाँ पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन…

सिंदी रेल्वे नगरपारिषदेला कायम स्वरुपी मुख्यधिकारी देण्यात यावे व पाच वर्षापासून रखडलेल्या रेल्वे पुलाचे काम त्वरित चालू करण्यात यावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत व प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे खासदार रामदासजी तडस, विधानपरिषद आमदार रामदासजी आंबटकर, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले व सिंदी रेल्वे शिष्टमंडळानी भेट घेतली होती… व या भेटीमध्ये सिंदी रेल्वे नगर परिषदेत कायमस्वरुपी मुख्याधिकारी देण्याचे आश्वासन खासदार तडस साहेबाना देण्यात आले होते. दीड महिन्याच्या कालावधी लोटून गेला असून अजूनही कायमस्वरुपी मुख्याधिकारी देण्याचे आश्वासन पूर्ण करण्यात आले नाही.

याकडे जिल्हाधिकारी साहेब यांनी लक्ष देवून तात्काळ कायमस्वरुपी मुख्याधिकारी देण्यात यावे.अशी मागणी करण्यात आली.
तसेच सिंदी रेल्वे येथील रेल्वे गेट वरील पुलाचे बांधकाम गेल्या पाच वर्षा पूर्वीपासून सुरु आहे. परंतु ते त्या पूलाचे काम अजूनपर्यंत पूर्ण करण्यात आले नाही. त्यामुळे येथील नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रखडलेल्या पूलाच्या कामामुळे जागोजागी खड्डे पडले असून त्या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.

पुलाचे काम स्थगित असल्याकारणाने हे खड्डे बुजविण्यात आले नाही. या खड्ड्यामुळे नागरिकांना जिवीत हानी होण्याची दाट शक्यता आहे. तसेच सदर रखडेलेल्या पुलाचे काम त्वरित सुरु करुन खड्डे ही तात्काळ बुजविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुनीलजी राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, युवक जिल्हाध्यक्ष संदीप किटे, पंकज बावणे, राजू मुडे आधी उपस्थित होते.

Leave a Comment